Saturday, November 27, 2021
Home क्रीडा WTC मध्ये भारत-वेस्ट इंडिजने जिंकल्या 1-1 टेस्ट, तरी कॅरेबियन टीम टॉपवर, कारण...

WTC मध्ये भारत-वेस्ट इंडिजने जिंकल्या 1-1 टेस्ट, तरी कॅरेबियन टीम टॉपवर, कारण…


मुंबई, 17 ऑगस्ट : भारतीय टीमचा इंग्लंडविरुद्ध (India vs England) लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये रोमांचक विजय झाला. मॅचच्या अखेरच्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान दिलं. इंग्लंडला ऑल आऊट करण्यासाठी भारताकडे 60 ओव्हर होत्या, पण टीमने 8 ओव्हर आधीच 120 रनवर इंग्लंडला ऑल आऊट केलं आणि मॅच 151 रनने जिंकली. याचसोबत टीमने 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. याआधी ट्रेन्ट ब्रिजमध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.
दुसऱ्या टेस्टमधल्या विजयासह भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Points Table) पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची (West Indies) टीम आहे. दोन्ही टीमना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या या सत्रात एक-एक विजय मिळाला आहे. वेस्ट इंडिजची विजयी टक्केवारी टीम इंडियापेक्षा जास्त असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिजने एक पैकी एक सामना जिंकल्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी 100 टक्के आहे, तर भारतीय टीमने 2 पैकी एक मॅच जिंकल्यामुळे त्यांची टक्केवारी 58.33 टक्के आहेत.


भारत आणि इंग्लंड यांना ट्रेन्ट ब्रीज टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे 4-4 पॉईंट्स मिळाले होते, पण धीम्या ओव्हररेटमुळे दोन्ही टीमचे 2-2 पॉईंट्स कमी करण्यात आले. आयसीसीच्या नियमानुसार जर एखादी टीम मर्यादित वेळात ओव्हर पूर्ण करत नसेल तर प्रत्येक ओव्हरचा एक अंक कमी होतो. ट्रेन्ट ब्रीज टेस्टमध्ये भारत आणि इंग्लंडने 2-2 ओव्हर कमी टाकल्यामुळे त्यांचे प्रत्येकी 2-2 पॉईंट्स कमी करण्यात आले. या कारणामुळे भारताची पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स कमी आहेत. इंग्लंडचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट 8.33 टक्के आहेत.
पॉईंट्स सिस्टीममध्ये बदल
WTC च्या नव्या पॉईंट्स सिस्टीमनुसार यावेळी जिंकलेल्या टीमकडे 100 टक्के पॉईंट, मॅच टाय झाली तर 50 टक्के पॉईंट आणि ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना 33.33 टक्के पॉईंट्स मिळतील. टीमने मॅच खेळून जेवढे पॉईंट्स मिळवले, त्याच्या टक्केवारीवर क्रमवारी ठरवली जाईल, त्यामुळे वेस्ट इंडिजची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. कारण एक मॅच खेळून एक विजय मिळवल्यामुळे त्यांचे पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स 100 टक्के आहे.
वेस्ट इंडिजने जिंकली पहिली टेस्ट
भारत-इंग्लंड यांच्याशिवाय वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पुढच्या सत्राच्या मॅच खेळत आहेत. वेस्ट इंडिजने पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजला या मॅचमध्ये अखेरच्या इनिंगमध्ये विजयासाठी 168 रनची गरज होती आणि त्यांच्या 9 विकेट गेल्या होत्या. पण केमार रोच (Kemar Roach) आणि जेडन सील्स (Jayden Seals) यांनी नाबाद 17 रनची पार्टनरशीप करून वेस्ट इंडिजला रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयामुळे वेस्ट इंडिज पहिल्या क्रमांकावर तर पाकिस्तानने अजून खातंही उघडलेलं नाही.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#WTC #मधय #भरतवसट #इडजन #जकलय #टसट #तर #करबयन #टम #टपवर #करण

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...