Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल World breastfeeding week : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग...

World breastfeeding week : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग एक्सपीरियंस, मीडियाने उठवलेल्या ‘या’ अफवांनंतरही एन्जॉय केलं Motherhood!


असे म्हणतात की स्तनपान केल्याने आई आणि मुल यांच्यात एक वेगळाच बॉन्ड तयार होतो. पण स्तनपान ही एक सोपी प्रक्रिया नाही. सुरुवातीला नव्याने आई झालेल्या स्त्रीला यामुळे काही अडचणींचा सामना जरूर करावा लागू शकतो. शिवाय पहिल्या बाळंतपणात माहिती कमी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण बाळाला पहिले 6 महिने हे आईचेच दूध द्यावे लागत असल्याने आणि ते त्याच्या शारीरिक सक्षमतेसाठी लाभदायक असल्याने स्तनपान गरजेचे आहे. केवळ सामान्य स्त्रियाच नाही तर प्रसिद्ध स्त्रिया जसे की बॉलीवूड अभिनेत्रींना या प्रक्रियेमधून जावे लागते.

ऐश्वर्या राय (Aishwarya rai bachchan), लारा दत्ता (Lara Dutta), सेलिना जेटली (Celina Jaitley), रवीना टंडन (raveena Tandon), करिश्मा कपूर (Karishma Kapoor), सोनाली बेंद्रे (sonali bendre) यांसारख्या अभिनेत्रींनी आपला स्तनपान अनुभव अनेकदा मुलाखती द्वारे शेअर केले आहे. आज आपण या लेखातून हाच अभिनेत्रींचा हा अनुभव कसा होता आणि त्यांनी विविध गोष्टी कशा हाताळल्या ते जाणून घेऊया.

लारा दत्ता

लारा दत्ताने जेव्हा महेश भूपती सोबत लग्नगाठ बांधली तेव्हा ती सर्वांसाठीच एक धक्का होता. त्या क्षणापासून लारा दत्ता अभिनयापासून दूर झाली आणि तिने संसारात लक्ष घालण्यास सुरुवात केले. तिला मुलगी झाल्यावर सुद्धा तिने आपले पूर्ण लक्ष तिच्या योग्य संगोपनावर दिले. लाराने सुद्धा आपली मुलगी सायराला स्वत:च स्तनपान केले. यामुळे दोघींमधील बॉन्ड तेव्हापासूनच मजबूत झाल्याचे लारा सांगते. लारा म्हणते की प्रत्येक आईने आपल्या मुलाला स्तनपान करणे महत्त्वाचे आहे. कारण आईच्या दुधामुळेच बाळ सक्षम राहते.

(वाचा :- Conceive Remedies : दररोज फक्त 10 मिनिटे करा ‘हे’ सोपे काम, आई-बाबा बनण्याच्या मार्गात कधीच येणार नाही अडथळा!)

ऐश्वर्या राय बच्चन

आज ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या 9 वर्षांची झाली आहे. पण जेव्हा ती झाली तेव्हा डिलिव्हरी नंतर ऐश्वर्याला सेलिब्रिटी असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले होते. तिचे वजन खूप वाढले होते. तिला सगळीकडे ट्रोल केले जात होते. तिची सुंदरता संपल्याच्या बातम्या येत होत्या. ती आता विश्वसुंदरी नसल्याचे सांगितले गेले. पण ऐश्वर्याने अजिबात याकडे लक्ष दिले नाही आणि ती आपल्या मुलीच्या संगोपनात बिझी झाली. तिने अजिबात विचार केला नाही की आपण स्तनपान केल्याने आपले स्तन बेडौल होतील. उलट तिने स्वत: आराध्याला स्तनपान करण्याचा आग्रह धरला होता. कारण तिला स्तनपानाचे महत्त्व माहित होते. अर्थातच या विश्वसुंदरीने देखील Motherhood आणि Breastfeeding चा काळ भरपूर एन्जॉय केला होता.

(वाचा :- Fertility Food : आई-बाबा बनण्याच्या मार्गातील अडथळा दूर करू शकतो ‘हा’ घरगुती पदार्थ, इनफर्टिलिटीवर आहे रामबाण उपाय!)

सेलिना जेटली

सेलिना जेटली आज तीन मुलांची आई आहे व ती सुद्धा स्तनपान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगते. तिच्या मते स्तनपानाचे फायदे केवळ बाळालाच नाही तर आईला देखील होतात. एका संशोधनामध्ये ही गोष्ट समोर आलो की सर्वायकल कॅन्सरने पिडीत असलेल्या महिलांना स्तनपान केल्याने अनेक शारीरिक लाभ मिळतात. सेलिनाने स्वत: आपल्या सर्व बाळांना 6 महिने स्तनपान केले होते आणि ती आजही विविध मुलाखतींमधून, संवादामधून अनेक स्त्रियांना स्तनपान करण्यास प्रोत्साहन देते.

(वाचा :- Men’s Infertility : पुरुषहो, पत्नीच नाही तर तुमचे नपुसंकत्व सुद्धा ठरू शकते आई-बाबा बनण्याच्या मार्गातील मोठा अडथळा, दुर्लक्ष न करता सुरू करा हे उपाय!)

​करिश्मा कपूर

करिश्मा कपूरचे म्हणणे आहे की गरोदरपणाच्या काळात कोणत्याही स्त्रीने वेट लॉस बद्दल विचार करू नये. प्रत्येक स्त्रीने पौष्टिक आहारच घ्यावा. डिलिव्हरीच्या नंतर जेव्हा स्त्री स्तनपान करते तेव्हा ती आपल्या वजनाबाबत अधिक चिंतीत असते. करिश्माचे म्हणणे आहे की गरोदरपणा असो व स्तनपानाची वेळ, दोन्ही वेळेस स्त्रियांनी आपल्या डाएटकडे लक्ष दिले पाहिजे. करिश्मा कपूर चिकन आणि फिश खाण्याची शौकीन आहे. तिने गरोदरपणात हे दोन्ही पदार्थ खूप एन्जॉय केले आणि गरोदरपणात मज्जा घेतली. हीच गोष्ट तिने स्तनपानावेळी सुद्धा केली होती.

(वाचा :- वयाच्या 40 शीत आई बनण्यासाठी काजोलच्या बहिणीने वापरला ‘हा’ मार्ग, साइड इफेक्ट्समुळे निघाले होते तनीषाचे अश्रू!)

ब्रेस्ट मिल्क लिक होत असल्यास

अनेक स्त्रियांचं स्तनपानाच्या काळात ब्रेस्ट मिल्क लीक होऊ शकतं. जर ब्रेस्ट मिल्क लीक होण्यामुळे चिंतीत होण्याची अजिबात गरज नाही. कारण आम्ही काही उपाय सांगणार आहोत जे वापरून तुम्ही यापासून नक्कीच आराम मिळवू शकता. स्तनापन अत्यंत गरजेचं असतं कारण यादरम्यान आई आणि बाळामधील सुंदर नातं फुलत जाते. काही स्त्रियांमध्ये स्तनपानाच्या सहाव्या ते १०व्या आठवड्यातच दूध लीक होणे बंद होते. बेस्ट मिल्क लीक होत असेल तर घाबरू नका. उलट स्तनांमध्ये चांगल्या पद्धतीने दूध तयार होत आहे, याचे संकेत शरीराकडून तुम्हाला मिळत आहेत हे लक्षात घ्या. पण जॉब करणाऱ्या महिला नेहमीच यावरील उपायाच्या शोधात असतात.

  1. स्तनपान करावे : ब्रेस्ट मिल्क लीक होत असल्यास आपल्या बाळाला स्तनपान करावे.
  2. ब्रेस्ट पंप : तसंच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण ब्रेस्ट पंपचा उपयोग करून दूध एखाद्या सुरक्षित आणि स्वच्छ भांड्यामध्ये भरून ठेवू शकता व आपल्या बाळाला पाजू शकता. पण या पर्यायाचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावे. ब्रेस्ट पंपने काढलेले दूध फ्रीजमध्ये ठेवावे की ठेवू नये? किती काळासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो? किती तासांच्या आत हे दूध बाळाला पाजणे योग्य ठरेल?ही सर्व माहिती आपल्या डॉक्टरांना विचारावी. शेवटी तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, हे कायम लक्षात ठेवा.
  3. ब्रेस्ट पॅड : आपण घराबाहेर पडणार असाल तर ब्रेस्ट पॅड किंवा तुमच्यासाठी कम्फर्टेबल असतील अशा कपड्यांचा वापर करावा.
  4. तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा : अधिक माहिती आणि पर्याय जाणून घेण्यासाठी कधीही आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे उत्तमच असेल.

(वाचा :- Conceiving Tips : भरपूर प्रयत्नांनंतरही आई-बाबा बनण्यात येतंय अपयश? मग कंसीव करण्यासाठी पीरियड्सच्या दिवसांत करा ‘ही’ ५ कामं!)

स्तनपानामुळे आई व बाळाला मिळणारे फायदे

आईचं दूध हे बाळाच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी अमृता समानच मानले जाते. स्तनपानामुळे केवळ बाळालाच नव्हे तर आईला देखील अनेक फायदे मिळतात. आईच्या दुधामुळे बाळाच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व बाहेरील संसर्गांचा धोका टळतो. स्तनपानामुळे बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. महत्त्वाचे म्हणजे बाळाचे पहिले सहा महिने पूर्ण होईपर्यंत केवळ आईचेच दूध पाजणे आवश्यक आहे.

(वाचा :- Weight Loss : डिलिव्हरीनंतर ‘या’ अभिनेत्रींपैकी कोणी 10 तर कोणी 15 दिवसांत घटवलं वजन, सुपर हॉट लुक पाहून सारेच थक्क!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#World #breastfeeding #week #वशवसदर #ऐशवरय #रय #बचचनन #शअर #कल #तच #बरसटफडग #एकसपरयस #मडयन #उठवललय #य #अफवनतरह #एनजय #कल #Motherhood

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha

<p>वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...