
आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं सेवन करून तुम्ही फिट राहू शकता
मुंबई, 25 जुलै : जगभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव असल्यामुळे सध्या अनेकजण घरूनच काम करत आहेत. मात्र घरून काम करताना काही आजार होऊ नये म्हणून अनेकजण फिटनेस (Fitness) फ्रिक बनून जिम (Gym) आणि वर्कआउट (Workout) करत आहेत. मात्र वर्कआउट केल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो किंवा अशक्तपणा जाणवतो. यामागे अनेक कारणं असू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं सेवन करून तुम्ही फिट राहू शकता आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही.
हॉट चॉकलेट
चॉकोलेट आवडत नाही अशी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. त्यामुळे दररोज वर्कआउटनंतर जर कोणी चॉकलेट खाण्यास सांगितलं तर आपण नक्कीच खाऊ. पण हॉट चॉकलेटमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. दररोज वर्काउटनंतर हॉट चॉकलेटचं सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा निघून जातो. तसंच चॉकलेटमुळे ताण कमी होण्यास मदत होते.
तुळशीचे बी
तुळशीच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, मँगनीज, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे तुम्हाला वर्काउटनंतर शक्ती मिळते. तसंच यामुळे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
क्विनोआ बाउल
जर का तुम्ही वजन कमी करण्यासोबतच अनेक प्रकारचे गंभीर आणि तीव्र आजारांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर तुम्हाला आपल्या डाएटमध्ये भाताऐवजी ब्लॅक क्विनोआ जरूर समाविष्ठ करणं आवश्यक आहे. क्विनोआ हे केवळ चवीचा नाहीतर आरोग्याचा खजिना आहे. जे शाकाहारी लोकं चवदार आणि निरोगी अन्नासाठी तळमळत असतात. त्यांच्यासाठी ब्लॅक क्विनोआ सर्वांत चांगला पर्याय आहे.
सूप
तयार करण्यासाठी सोपं आणि सर्वात हेल्दी असा कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे सूप. वर्कआउटनंतर कुठलाही सूप पिणं महत्वाचं आहे. सूपमध्ये असलेल्या भाज्यांमुळे आणि यातील गुणधर्मांमुळे शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. तसंच सर्दीपासून बचाव करण्यासाठीही सूप पिणं फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज वर्कआउटनंतर सूप नक्की प्या.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Workout #नतर #तमहलह #अशकतपण #जणवत #य #पदरथच #सवन #कर #आण #थकव #दर #कर