Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट

WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट


नवी दिल्ली, 15 जानेवारी : काही दिवसांपूर्वी WhatsApp च्या नावाने एक मोठा घोटाळा समोर आला होता. WhatsApp वर Rediroff.ru नावाने फसवणुकीला सुरुवात झाली होती. या फिशिंग घोटाळ्याद्वारे फ्रॉडस्टर्स सोशल इंजिनियरिंग मेथडचा वापर करुन वैयक्तिक आणि फायनेंशियल माहितीपर्यंत पोहोचत होते. फसवणूक करणारे सर्वात आधी युजरला WhatsApp वर लिंक पाठवतात. ज्यावेळी युजर लिंकवर क्लिक करतात, त्यावेळी नवं वेबपेज ओपन होतं. या वेबपेजमध्ये एक सर्व्हे करावा लागतो. सर्व्हे करुन युजर चांगलं बक्षिस जिंकू शकतो असं सांगितलं जातं. या सर्व्हेमधून युजर्सची संपूर्ण माहिती स्कॅमर्सपर्यंत पोहोचते.

सायबर सुरक्षा कंपनी कॅस्पर्सकी (cybersecurity company Kaspersky) चे डायरेक्टर दिमित्री बेस्टुजेव (Dmitry Bestuzhev) यांनी सांगितलं, की WhatsApp मध्ये सुरक्षेबाबत अनेक त्रुटी आहेत. WhatsApp वर युजर्सने आपली कोणत्याही प्रकारची पर्सनल माहिती शेअर करू नये.

हे वाचा – UPI Payment करता?UPI PINद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून करा बचाव, NPCI ने केलं अलर्ट

www.express.co.uk मध्ये प्रकाशित एका माहितीनुसार, दिमित्री बेस्टुजेवने स्पॅनिश न्यूज एजेन्सीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, की WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही. फ्रॉडस्टर्स WhatsApp युजर्सच्या डेटावर नजर ठेवून असतात आणि मोठी संधी मिळतात त्याचा गैरवापर केला जातो.

हे वाचा – कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

WhatsApp पासून इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खासगी माहिती शेअर करू नका. सायबर सिक्योरिटी एजेन्सीच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉडस्टर्ससाठी WhatsApp नवं नाही, जगभरातील मेसेजिंग सेवेच्या सुमारे 200 कोटी वापरकर्त्यांना लक्ष्य करणं हे फ्रॉडस्टर्सचं टार्गेट आहे. त्यामुळे WhatsApp वर कोणतीही माहिती शेअर करू नका. कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#WhatsApp #सरकषत #पलटफरम #नह #सयबर #सकयरट #कपनन #कल #अलरट

RELATED ARTICLES

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Most Popular

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

IPL 2022 मध्ये दोन भावांच्या दोन कहाण्या, एक हिरो तर दुसरा झिरो!

मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) शेवटच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ...

IPL 2022 Eliminator RCB vs LSG: लखनऊ-बँगलोरसाठी ‘करो या मरो’, राहुलने टॉस जिंकला

कोलकाता, 25 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG vs RCB) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul)टॉस जिंकून...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, हातात हात घेऊन दिली रोमँटिक पोज

मुंबई: फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar Birthday) याने २५ मे रोजी त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान बॉलिवूडच्या या बड्या फिल्ममेकरच्या वाढदिवसाची पार्टीही...

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2022 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2022 | गुरुवार 1. सकाळी सकाळीच परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर...

कैदी नवज्योतसिंग सिद्धु यांना तुरुंगात मिळतेय पंचपक्वान; एकदा यादी पाहाच

पतियाळा: सन १९८८मधील रस्त्यावरील भांडणातून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली...