WhatsApp ने टू-स्टेप वेरिफिकेशन फीचर युजर्सच्या अकाउंट सेफ्टीसाठी लाँच केलं होतं. आता हॅकर्स याचा वापर हॅकिंगसाठी करत असल्याचं समोर आलं. याला वेरिफिकेशन कोड स्कॅमही म्हटलं जात आहे. हा कोड टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड असतो. फोन चेंज करताना WhatsApp अकाउंट अॅक्टिवेट करण्यासाठी हा गरजेचा असतो.
हे वाचा – UPI Payment करता?UPI PINद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून करा बचाव, NPCI ने केलं अलर्ट
असा होतो फ्रॉड –
हॅकर्स युजर्सला लॉगइन कोडसह एक टेक्स्ट मेसेज करतात. हॅकर्स एखाद्या मित्राच्या किंवा फॅमिली मेंबरच्या नंबरने मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये ‘Hey! I accidentally sent you my WhatsApp log-in code. Could you send it back to me please?’ लिहिलेलं असतं. युजर हॅकर्सच्या या जाळ्यात अडकतात आणि एखाद्याने खरंच चुकून लॉगइन कोड पाठवल्याचं समजून तो परत शेअर करतात.
हॅकर्सकडून पाठवण्यात आलेल्या या मेसेजला रिप्लाय केला तर अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो. या वेरिफिकेशन कोडच्या मदतीने हॅकर्स तुमच्या अकाउंट मध्ये लॉगइन करतात आणि तुम्ही अकाउंटमधून लॉगआउट होता.
महत्त्वाची बाब म्हणजे हॅकर्सच्या हातात तुमचं WhatsApp Account गेल्यानंतर ते सहजपणे तुमच्या नावाने तुमच्या मित्रांना, कुटुंबियांनाही निशाणा बनवू शकतात.
हे वाचा – WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट
फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय कराल?
तुम्हाला चुकूनही असा मेसेज आला, तर तो लगेच डिलीट करा. त्याशिवाय तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना याबाबत माहिती द्या. चुकून अकाउंट हॅक झालं, तर पुन्हा अकाउंटमध्ये लॉगइन करा. लॉगइन करण्यासाठी तुमच्या नंबरवर योग्य वेरिफिकेशन कोड येईल. तो टाकल्यानंतर हॅकर्स तुमच्या अकाउंटमधून लॉगआउट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#WhatsApp #वर #अस #मसज #आल #तर #सवध #वह #हकरसकडन #हऊ #शकत #मठ #फसवणक