कर्करोग हा नेहमीच एक असा आजार मानला जात होता, जो अनेकांपैकी फक्त काही लोकांना किंवा एक-दोन लोकांनाच होत असे. पण आज खरोखरच कॅन्सरच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत भारतात कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. पण आपल्या सामान्य शरीरात कर्करोगाच्या पेशी कशा अॅक्टिवेट होतात आणि शरीरात अचानक कर्करोगाच्या पेशी का व कुठून निर्माण होतात याचे कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
कॅन्सरची कारणे

कोच्चीचे अमृता हॉस्पिटल मेडिकल ऑन्कोलॉजी अँड हेमोटोलॉजीचे क्लीनिकल एसोसिएट प्रोफेसर डॉ. वेस्ले एम जोस, यांनी कर्करोगाचे कारण सांगितले आहे. ते म्हणतात की कर्करोग हा अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही कारणांमुळे होतो. आंतरिक घटकांमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन म्हणजेच जेनेरिक म्युटेशन, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत स्थिती, ओवर अॅक्टिव्हेशन आणि बाह्य घटकांमध्ये धूम्रपान, मद्यपान व व्हायरल इनफेक्शन यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकट्याने किंवा एकत्र येऊन सामान्य पेशींना गंभीर बनवतात.
(वाचा :- रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास येईल हार्ट अटॅक, करा न्युट्रिशनिस्टने सांगितलेले ‘हे’ 5 स्वस्त व रामबाण उपाय..!)
कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक

मॅक्स हॉस्पिटल पटपडगंजचे सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डायरेक्टर डॉ. सत्यम तनेजा म्हणतात की, डॉक्टरांना चांगल्या प्रकारे माहित असते की कोणत्या गोष्टींमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो, परंतु बहुतेक कर्करोगाचे प्रकार हे अशाच लोकांमध्ये दिसून येतात ज्यांच्या शरीरात कोणतेही धोका वाढवणारे घटक नसतात. कर्करोगाचा धोका वाढवण्यासाठी खाली दिलेले घटक जबाबदार आहेत –
(वाचा :- Monkeypox : भय इथले संपत नाही, कोरोनानंतर आता मंकीपॉक्स व्हायरसचा धुमाकूळ, ‘ही’ लक्षणे ओळखा व ताबडतोब व्हा सावध..!)
आपले वय

कॅन्सर शरीरात डेव्हलप होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की कर्करोगाने पीडित बहुतेक लोकांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असते. वृद्ध लोकांमध्ये हे सामान्य आहे. कर्करोग हा केवळ वृद्ध लोकांना होणाराच आजार नाहीये. तर तो कोणत्याही वयात होऊ शकतो. एवढंच की तो पूर्णपणे डेव्हलप होण्यासाठी बराच काळ जातो.
(वाचा :- Blood Pressure : उच्च रक्तदाबाविषयी असलेले 9 गैरसमज, आजच दूर करा)
वाईट सवयी

कॅन्सरचा धोका वाढवण्यासाठी जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. दिवसातून एक किंवा अधिक वेळा दारूचे सेवन करणे, सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात येणे, वाढलेला लठ्ठपणा आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
(वाचा :- World Hypertension Day : औषधं खाण्याची अजिबात गरज नाही, ‘या’ 5 सोप्या पद्धतींनी करा ब्लड प्रेशर कंट्रोल..!)
कौटुंबिक इतिहास

कौटुंबिक इतिहास हा देखील कर्करोगाचे एक लहान कारण आहे. जर तुमच्या कुटुंबात कॅन्सर सामान्य असेल तर पुढच्या पिढीलाही याचा धोका असतो. लक्षात ठेवा की अनुवांशिक उत्परिवर्तनाचा किंवा जेनेरिक म्युटेशनचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्हाला कर्करोग 100 टक्के होणारच आहे.
(वाचा :- प्रत्येक विवाहित पुरूषांने जरूर खाल्ली पाहिजे ‘ही’ गोष्ट, यामागील सायंटिफिक कारण ऐकून व्हाल हैराण..!)
मेडिकल कंडीशन

अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या काही जुनाट आजारांमुळे तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला या आजारांनी ग्रासले असेल, तर तुम्ही सतर्क राहावे आणि काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
(वाचा :- उन्हाळ्यात किडनी व आतड्यांची सफाई करतं ‘हे’ खास फळ, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 8 जबरदस्त फायदे..!)
वातावरण

तुमच्या सभोवतालच्या वातावरणात हानिकारक रसायने असू शकतात, जी कर्करोगाचा धोका वाढवण्यासाठी जबाबदार ठरतात. तुम्ही धुम्रपान करत नसलात तरी तुम्ही अशा ठिकाणी बसलाय जिथे लोक धूम्रपान करतायत तर यामुळे तुम्हालाही कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
(वाचा :- ‘या’ सोप्या ट्रिकने घटवलं तब्बल 10 किलो वजन, थक्क करणारं टान्सफॉर्मेशन बघून थट्टा उडवणा-यांची बोलती बंद..!)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Cancer #हलद #शररत #कनसरल #जनम #दतत #य #गषट #महत #असनह #लक #सडत #नहत #नबरच #अतभयकर #सवय