Saturday, November 27, 2021
Home करमणूक Web Series- 'हिंग पुस्तक तलवार'चा पोट धरून हसायला लावणारा ट्रेलर पाहिलात का?

Web Series- ‘हिंग पुस्तक तलवार’चा पोट धरून हसायला लावणारा ट्रेलर पाहिलात का?


मुंबई- ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वीच प्लॅनेट मराठीने आपल्या आगामी वेबसीरिजचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. वेगळ्या धाटणीचे विषय असणाऱ्या या ट्रेलर्सना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘सोप्प नसतं काही’ आणि ‘जॉबलेस’ या दोन वेगळ्या विषयांनंतर ‘प्लॅनेट मराठी’ आता निपुण धर्माधिकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे, मकरंद शिंदे दिग्दर्शित ‘हिंग पुस्तक तलवार’ ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

घर बसल्या पाहू शकणार अमृता खानविलकरची लाइफस्टाइल

नाव ऐकूनच थोडे विचारात पडलात ना? काय आहे हे नक्की? या वेब सीरिजचे नावच इतके अफलातून आहे. त्यामुळे यात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशीच मित्रपरिवारातील सर्वांचे व्यक्तिमत्वही सारखे नसते. अशाच वेगवेगळ्या पार्श्वभूमीचा मित्रपरिवार एकत्र येऊन प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘हिंग पुस्तक तलवार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ही वेबसीरिज बघताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची नक्कीच आठवण येईल.

मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाची अशी एक विशेष ओळख असते. सर्वांचेच स्वभाव काही सारखे नसतात. या वेबसीरिजमध्येही तशाच काही ना काही खासियत असणाऱ्या भन्नाट व्यक्तिरेखा आहेत. कॉर्पोरेटच्या कटकटीला कंटाळलेला ‘अक्षय’ तर गर्लफ्रेंड आणि बॉसमध्ये अडकलेला ‘अमित’, साधी भोळी आणि इनोसेंट अशी ‘अमृता’, दुसऱ्यांची लग्न जुळवणारा पण स्वतःच्या गर्लफ्रेंडला प्रत्येक मुलीत शोधणारा ‘समर’ तसेच मित्रांमध्ये बडबड करणारा परंतु इतरांसमोर शांत असणारा ‘कौस्तुभ’, खूपच प्रॅक्टिकल असणारी ‘सानिका’ आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचे वन स्टॉप सोल्युशन देणारा ‘पांडे’.

आता हे भिन्न स्वभावाचे सर्वजण जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय धम्माल उडेल, हे प्रेक्षकांना ३१ ऑगस्ट पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर पाहायला मिळेल. ओमकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी ही वेबसीरिज लिहिली असून यात अक्षयची भूमिका शौनक चांदोरकर, अमितची भूमिका सुशांत घाडगे, अमृताची भूमिका केतकी कुलकर्णी, समरची भूमिका क्षितिश दाते, कौस्तुभची भूमिका नील सालेकर, सानिकाची भूमिका मानसी भवाळकर आणि पांडेची भूमिका आलोक राजवाडे ने साकारली आहे. ही धमाल गॅंग ‘हिंग पुस्तक तलवार’ मधून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एका पेक्षा एक हास्यकल्लोळ माजवणारी मंडळी एकत्र आल्याने ‘हिंग पुस्तक तलवार’ ही वेब सीरिज प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे हे मात्र नक्की.

‘कदाचित उद्या हे आपल्या इथंही घडेल, पण आपल्याकडे मोदी आहेत’अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Web #Series #हग #पसतक #तलवरच #पट #धरन #हसयल #लवणर #टरलर #पहलत #क

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

Most Popular

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...