Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, ऑरेंज अलर्टचा इशारा

Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, ऑरेंज अलर्टचा इशारा


मुंबई, 1 जुलै : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर याबरोबरच राज्यात सर्वत्र दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचले. याता आता पुन्हा आता हवामान खात्याकडून (IMD) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याचा इशारा काय – 

भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 1 जुलै ते 5 जुलै 2022 या कालावधीत रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मागील 24 तासात कुलाबा वेधशाळेत 227 आणि सांताक्रूझ वेधशाळेत 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. मात्र, याबरोबरच हवामान खात्याने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

पर्यटकांची मरिन ड्राईव्हवर गर्दी –

मुंबईत मागील 24 तासांत सरासरी 175 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजेनंतर भरती काळात 4.25 मीटर पर्यंत उंच लाटा समुद्रात उसळल्या. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. तर दुसरीकडे मुंबईतील पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मरिन ड्राईव्हवर गर्दी केली होती.

हेही वाचा – बापरे बाप! आकाशातून झाडावर कोसळला ‘आगीचा गोळा’; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य; पाहा VIDEO

दरम्यान, आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण विभागाला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यात कोकणात, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, पुण्यात अद्यापही मनासारखा पाऊस झाला नाही. येथील शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Weather #Update #य #जलहयमधय #जलपरयत #अत #मसळधर #ऑरज #अलरटच #इशर

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

हिपॅटायटिसने प्रत्येक 30 सेकंदाला होतो 1 मृत्यू, WHO च्या टिप्स

हिपॅटाइटिस (Hepatitis Virus) हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो शरीरात जाऊन लिव्हरला सूज येण्यामागचे प्रमुख कारण ठरतो. लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण...

१६ जीबी रॅमसह येणाऱ्या OnePlus च्या ५जी फोनवर ५ हजार रुपयांची सूट, ऑफर एकदा पाहाच

नवी दिल्ली :OnePlus ने काही दिवसांपूर्वीच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. वनप्लसचा हा फोन ८ जीबी + १२८ जीबी...

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...

Pune : पुणे – मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम?

<p>पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.&nbsp;<br />अप...

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...