Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या Wardha Crime : प्रेम करणं महागात पडलं! पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या 

Wardha Crime : प्रेम करणं महागात पडलं! पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या 


Wardha Crime News Latest Update : अल्पवयीन मुलीला प्रेम करणं चांगलंच महागात पडलं आहे. जन्मदात्या पित्यानंच आपल्या मुलीला प्रेम केल्यामुळं संपवल्याची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील (Wardha News) दहेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत हमदापूर येथे बुधवारी 11 मे दुपारी पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे झालेल्या वादात लाकडी वस्तूने डोक्यावर गंभीर वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पिता विलास पांडुरंग ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या मुलीचे गावातीलच एका युवकाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आरोपी पित्याने त्याच्या मुलीला तिच्या मामाच्या घरी वर्धा येथे पाठवले होते. दरम्यान अल्पवयीन मुलीचा प्रियकराने मुलीच्या मामाच्या घरून मुलीचे अपहरण केले होते. त्यामुळे युवकाविरुद्ध ऑक्टोबर 2021 मध्ये रामनगर पोलीस ठाण्यात अपहरणासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर अल्पवयीन मुलगी आपल्या मामाच्या घरून परतली. आरोपी पिता आणि मृतक अल्पवयीन मुलगी यांच्यात नेहमी वाद-विवाद होत असायचे. 11 तारखेला देखील असंच काही घडलं. रात्री जेवणाच्या वेळी स्वयंपाकाची चव बिघडल्यावरून आरोपी आणि मुलीमध्ये वाद झाला होता अशीही माहिती मिळाली आहे. हा वाद बुधवारी 11 मे ला विकोपाला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं. पित्याकडूनच अल्पवयीन मुलीची हत्या झाल्यानं गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. 

दहेगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपी पिता विलास ठाकरेला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोलंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुश जगताप, दहेगांव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह चमू दाखल झाली. दहेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Beed Crime: घरातून निघून गेल्याच्या कारणावरुन पत्नीचा खून; आष्टीमधल्या शेरी बुद्रुक इथली घटनाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Wardha #Crime #परम #करण #महगत #पडल #पतयकडन #आपलय #अलपवयन #मलच #हतय

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

IPL 2022 : RCB होणार चॅम्पियन! ‘लकी चार्म’ करणार विराटचं स्वप्न करणार पूर्ण

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 चा चॅम्पियन कोण? याचा निर्णय आता फक्त 2 मॅचनंतर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये (IPL 2022)...

उन्हाळ्यात मुतखडा होण्याचा धोका जास्त? या काही गोष्टींची वेळीच घ्या काळजी

नवी दिल्ली, 26 मे : हैदराबादमधील डॉक्टरांनी किडनीतून 206 खडे काढल्याच्या बातमीने ऑनलाइन जगतात खळबळ उडाली होती, आता लोक उन्हाळ्यात आपल्या आरोग्याचा अधिक...

‘नाव गाव माहीत नसताना ही तुझे…’ मधुराणीच्या आवाजातील सुंदर कविता ऐकली का?

मुंबई, 25 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

मोदी सरकारच्या या महत्वाच्या योजना नक्की जाणून घ्या; ज्यामुळं पंतप्रधान मोदी पोहोचले घराघरात…

Modi@8 : मोदी सरकारच्या या महत्वाच्या योजना नक्की जाणून घ्या; ज्यामुळं पंतप्रधान मोदी पोहोचले घराघरात... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

iPhone Offers: अर्ध्या किमतीत iPhone 12 आणि iPhone 13 होणार तुमचा, या साईटवरून करा खरेदी, पाहा डील

नवी दिल्ली: Discounts On iPhone:iPhone साठी खूप पैसे खर्च करणे शक्य नसल्यामुळे प्रत्येकाला आयफोन खरेदी करता येत नाही. हेच कारण आहे की, iPhone...