Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट VIDEO - स्कूटरपाठोपाठ आता इलेक्ट्रिक कारही पेटली; मुंबईत Tata Nexon EV जळून...

VIDEO – स्कूटरपाठोपाठ आता इलेक्ट्रिक कारही पेटली; मुंबईत Tata Nexon EV जळून खाक


मुंबई, 23 जून : गेल्या काही महिन्यांत देशात इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षततेबाबत बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आला. अशात एका इलेक्ट्रिक कारलाही आग लागल्याची घटना समोर आली आहे (Electric car fire). मुंबईत टाटा नेक्सन ईव्हीला (Tata Nexon EV) आग लागली आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Tata Nexon EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. याच कारने मुंबईच्या रस्त्यावर पेट घेतला आहे.  वसई पश्चिम परिसरातील ही घटना आहे. रस्त्यावर कार आगीच्या विळख्यात सापडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे.कार का पेटली यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे पण  प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे कारमध्ये आग लागल्याचं सांगितलं जातं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
दरम्यान याबाबत टाटा मोटर्सने कारमध्ये आग का लागली, याचा तपास करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. कंपनीने सांगितलं की तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेची सविस्तर माहिती दिली जाईल. याआधी इलेक्ट्रिक टू व्हिलर्समध्ये लागलेल्या आगीच्या घटनांचा सविस्तर तपास सुरू आहे.

या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतं. याच्या मोटर 129 बीएचपी पॉवर आणि 245 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचंही ऑप्शन मिळतं. डीसी फास्ट चार्जर वापरून ही कार फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. रेग्युलर चार्जरने 8 तासात  20 ते 100 टक्के चार्ज होते. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार 312 किमी प्रति रेंज देते.
टाटा मोटर्सने ( Tata Motors) नुकतीच भारतात Nexon EV Max सुद्धा लाँच केली आहे. ज्यात एक मोठं बॅटरी पॅक मिळतं, जी अधिक शक्ती आणि टॉर्क विकसित करतं. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार  437 किमी रेंज देत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #सकटरपठपठ #आत #इलकटरक #करह #पटल #मबईत #Tata #Nexon #जळन #खक

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

प्रत्येक महिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा, Airtel-Jio-Vi च्या या प्लान्समध्ये मिळतो ३६५ दिवस २ GB पर्यंत डेटा

नवी दिल्ली: Best Annual Plans: दूरसंचार ऑपरेटर Airtel, Jio आणि Vodafone-Idea असे अनेक प्लान्स प्रदान करतात. जे दररोज २ जीबी डेटासह येतात. यामध्ये...

VIDEO: नीरज चोप्राची नवी भरारी, स्वत:चाच रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली, 01 जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच...

प्रेमाचे परिणाम भोगावेच लागतात, मलायकाबरोबरच्या नात्याविषयी अर्जुन कपूर बोलला बरंच काही!

मुंबई : मलायका आणि अर्जुनचं प्रेमाचं नातं तर आता उघड आहेच. १९ वर्षांच्या संसारानंतर मलायकानं अरबाझ खानला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर २०१९ मध्ये मलायका...

करण जोहरला मोठा धक्का,’या’ दोन स्टार्सनी नाकारली Koffee With Karanची ऑफर!

करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून

मुंबई 1 जुलै: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale arrest) च्या अटकेनंतर बरंच नाट्य घडलं होतं. या अभिनेत्रीला एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तब्ब्ल 41 दिवस...

श्रीलंकेला लोळवत टीम इंडियाला दिला धक्का; ऑस्ट्रेलियाने घेतली निर्णायक आघाडी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल हे नंतर ठरवले जाईल, पण ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने मिळवलेल्या...