दिल्लीत सीआयएसएफ (CISF) जवानांनी (CISF Jawan) तरुणीचा जीव वाचवताना जे काही केलं आहे, ते पाहून तुम्हीही सॅल्युट कराल. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला त्यांनी वाचवलंच पण त्यानंतर तिचं उघडं पडलेलं शरीर एका जवानाने आपल्या वर्दीने झाकलं आहे.
@CISFHQrs जवानांना सॅल्युट! दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला वाचवलं. तिचं विवस्त्र शरीर एका जवानाने आपल्या वर्दीने झाकलं. pic.twitter.com/5fxMPJSfWq
— News18Lokmat (@News18lokmat) August 3, 2021
जवानांचा गणवेश, वर्दी म्हणजे त्यांची शान असते, त्यांचा अभिमान असतो. त्याच्यावर साधा डागही ते पडू देत नाही. पण जेव्हा एका तरुणीची लाज राखण्याची वेळ आली तेव्हा मात्र क्षणाचा विलंबही न करता हीच वर्दी आपल्या अंगावरून उतरवली आणि तरुणीच्या अंगावर चढवली.
हे वाचा – VIDEO : चाकू हल्ल्यात रक्तबंबाळ झाला तरुण; चिप्सच्या पॅकेटने पोलिसाने वाचवला जीव
दिल्लीच्या जनकपुरी मेट्रो स्टेशनमधील ही घटना. मेट्रोसमोर एका तरुणीने उडी मारली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी सीआयएसएफचे जवान तात्काळ धावून आले. त्यांनी या तरुणीला वाचवलं. तरुणी ट्रेनच्या खाली गेली होती. ट्रेनखालून तिला या जवानांनी बाहेर काढलं. तिच्यात जीव होता. तरुणीला जिवंत पाहताच जवानांनी तिला उचललं आणि रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी धाव घेतली.
हे वाचा – रस्त्यावर धावत सुटला चिमुकला, वेगाने कार आली आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
या तरुणीच्या शरीरावरील कपडे फाटले होते. तिचं शरीर दिसत होतं. तिला दोन ट्रेनच्या मधून नेण्यात आलं. थोडं पुढे गेल्यावर या तरुणीला स्ट्रेचरवर ठेवलं. तेव्हा एका जवानाने आपल्या गणवेशाचा शर्ट उतरवतो आणि त्या तरुणीच्या अंगावर घालून तिचं उघडं शरीर झाकलं. त्यानंतरच या तरुणीला तिथून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#VIDEO #सलयट #जवसह #लजह #वचवल #जवनन #आपलय #वरदन #झकल #आतमहतय #करयल #गललय #तरणच #ववसतर #शरर