Saturday, August 13, 2022
Home भारत VIDEO: संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले

VIDEO: संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले


हायलाइट्स:

  • संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापूर्वी विरोधी पक्ष एकमेकांशी भिडले
  • कृषी कायद्यांवरून दोन्ही नेत्यांत शाब्दिक चकमक
  • संसदेबाहेरच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप

नवी दिल्ली : विरोधकांकडून करण्यात आलेल्या पेगॅसस हेरगिरी, इंधनाच्या वाढलेल्या किंमती तसंच कृषी कायद्यांच्या मुद्यावर चर्चेच्या मागणीवरून संसदेचं कामकाज अनेकदा प्रभावित झालंय. विरोधकांच्या या मागणीवर अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सत्ताधारी भाजपलाही अद्याप मार्ग सुचू शकलेला नाही. मात्र, आज दोन वेगवेगळ्या विरोधी पक्षांचे नेते एकमेकांशीच भिडताना दिसले.

हा प्रकार आज सकाळी संसदेच्या गेट क्रमांक ४ जवळ दिसून आला. पंजाबचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू आणि माजी केंद्रीय मंत्री, अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल हे एकमेकांसमोर येताच या दोघांच्या शाब्दिक फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या.

Monsoon Session: संसदेत विरोधकांकडून पोस्टरबाजी, वैतागून सभापतीही जागेवरून उभे राहिलेदिल्ली बलात्कार आणि हत्या : राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीला
सदनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी रवनीत सिंह बिट्टू गेट क्रमांक ४ मधून लोकसभेत सहभागी होण्यासाठी जात होते. याच वेळी कृषी कायद्यांविरोधात पोस्टर फडकावत हरसिमरत कौर बादल आणि अकाली दलाचे इतर खासदार इथे उभे असलेले त्यांच्या नजरेस पडले.

हरसिमरत कौर यांना पोस्टरबाजी करताना पाहून रवनीत सिंह बिट्टू यांचा पार चढला आणि त्यांनी हरसिमरत कौर यांच्यावर नाटक करत असल्याचा आरोप केला.

कृषी कायदे तयार करण्यात आले आणि मंत्रिमंडळानं या कायद्यांना मंजुरी दिली तेव्हा शिरोमणी अकाली दल मोदी मंत्रिमंडळाचाच एक भाग होतं आणि हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्री होत्या, याची रवनीत सिंह यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली.

मग काय… रवनीत सिंह बिट्टू यांचे आरोप सहन न झाल्यानं हरसिमरत कौरही त्यांना भिडल्या आणि या दोन्ही नेत्यांत शाब्दिक चकमकीला सुरूवात झाली.

हरसिमरत कौर बादल यांनी रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर खोटा प्रचार करण्याचा आणि काँग्रेसकडून जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

आपण मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायद्यांवर अकाली दलाकडून विरोध दर्शवण्यात आला होता, हे अगोदरच हरसिमरत कौर यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच पंजाब-हरयाणामधून कृषी कायद्यांना प्रखर विरोध झाल्यानंतर याच मुद्यावर अकाली दलानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला होता.

मध्य प्रदेशात पुराचा कहर; NDRF, SDRF सहीत लष्कराला पाचारण
Rape Case: फक्त नावावरून पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीला ‘फेसबुक’वरून धुंडाळून काढलंअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #ससदसमरच #वरध #कगरसअकल #दलच #नत #एकमकन #भडल

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Todays Headline 12th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र भूमी पावन बनवली आहे.  याच संत परंपरेमधील एक...

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; रोजच्या आहारात ‘असा’ वापर करा

Cause Of Cancer : शरीरातील कोणत्याही पेशीची असामान्य वाढ होत राहिल्यास त्याचे कॅन्सरमध्ये (Cancer) रूपांतर होते. आपल्या शरीरात...

सोनमनं केली सेलिब्रिटींच्या महागड्या कपड्यांची पोलखोल, म्हणाली इतका पैसा…

Sonam Kapoor at Koffee with Karan: कॉफी विथ करण या शोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमध्ये बॉलिवूड स्टार सोनम कपूर आणि...