Saturday, August 20, 2022
Home क्रीडा VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन


नवी दिल्ली, 02 जून : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने एजबॅस्टन येथे ‘वन मॅन शो’ कामगिरी केली. पंतने 111 चेंडूत 146 धावांची शानदार खेळी केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवशी पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलाच समाचार घेतला. त्याने आपल्या खेळीत 20 चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी, जेम्स अँडरसनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी 100 धावांच्या आत भारताचे 5 फलंदाज तंबूत पाठवत स्टोक्सचा निर्णय योग्य ठरवला. पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे चित्र बदलले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने अवघ्या 73 षटकांत 7 गडी गमावून 338 धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजा 85 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमी शून्यावर खेळत (IND vs ENG 5th Test) आहे.

ऋषभचे प्रत्येक मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक –

पंतने चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर ओव्हलच्या मैदानावर पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने आत्तापर्यंत पाच शतके झळकावली असून त्यापैकी 4 विदेशी मैदानावर झळकावली आहेत. पंतने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 159*, अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध 101, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर या वर्षी नाबाद 100 आणि नंतर एजबॅस्टन येथे 146 धावा केल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पंतने सर्व शतके झळकावली. पंत आता निर्णायक सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळत आहे. याशिवाय, सामन्याचे फासे कधीही उलटवण्याची त्याची क्षमता आहे.

हे वाचा – Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी
पंतच्या शतकावर राहुल द्रविडचे खास सेलिब्रेशन –

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला फक्त ही कसोटी किमान ड्रॉ करायची आहे. भारताने अखेरची कसोटी मालिका 2007 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर 1-0 अशी जिंकली होती. त्यावेळी राहुल द्रविड टीम इंडियाची कमान सांभाळत होता. आता द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.

100 धावांच्या आत पाच विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत दिसत होती. त्यानंतर पंत आणि जडेजाने 239 चेंडूत 222 धावांची भागीदारी करून द्रविडची चिंता दूर केली. पंतच्या शतकानंतर राहुल द्रविडने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले. ड्रेसिंग रूममधील इतर सहकारी खेळाडूंनीही त्याचे जोरदार अभिनंदन केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#VIDEO #सयम #दरवडच #ह #रप #पहल #नसल #पतचय #शतकनतर #कल #अस #सलबरशन

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

Most Popular

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...