सोनालीने गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये दुबईमध्ये जॉब करणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला होता. त्यांनतर यावर्षी लॉकडाऊनमध्येचं सोनालीने कुणालशी लग्नसुद्धा उरकलं आहे. लॉकडाऊन असल्याने सोनाली आणि कुणालने आपल्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीचं दुबईमध्ये लग्न पार पाडलं होतं. त्यामुळे ती काही महिने कुणालसोबत दुबईमध्येचं राहात होती. तर त्यावेळी ती कुणालसोबत आफ्रिकेच्या सफरवर सुद्धा गेली होती. आणि तेथील सुंदर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत होती. त्यांनतर ती भारतात परतली होती. मायदेशी परतल्यानंतर तिने आपल्या राहिलेलं शुटींग पूर्ण केलं.
(हे वाचा: जुन्या मराठी मालिका घेणार एक्झिट; तर ‘या’ 5 नव्या मालिकांची होणार एन्ट्री!)
आत्ता परत ती आपल्या पतीसोबत मालदीव वेकेशनसाठी गेली आहे. पुन्हा एकदा सोनाली आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत आहे. नुकताच सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवरून लाईव्ह सेशनसुद्धा केलं होतं. यामध्ये तिने आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त दिलेलं सुंदर सरप्राईझसुद्धा दाखवलं. तसेच निळाशार समुद्र आणि मालदीवच्या वातावरणाची सैरसुद्धा घडवली.
(हे वाचा:फुलपाखरू’ फेम हृताचं टीव्हीवर कमबॅक; या नव्या मालिकेत झळकणार)
या लाइव्ह सेशनमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सई ताम्हणकरसुद्धा तिच्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. त्या दोघींनीसुद्धा सोनाली आणि कुणालची मजेशीर गंमत जमत केली. नंतर सोनालीने पुढे मिळून एकत्र मालदीव वेकेशनवर येण्याची ग्वाहीही दिली. त्याचबरोबर सोनालीने आपल्या गळ्यातील खास मंगळसुत्राबद्दलही चाहत्यांना सांगितलं. एकंदरीतचं सोनाली आणि कुणालचं हे वेकेशन सुपरहिट ठरत आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#VIDEO #मलदवमधन #सनलच #LIVE #सशन #पतल #दल #खस #सरपरइज