पश्चिम बंगालमधील ही घटना आहे. बालीचक रेल्वे स्टेशनवरील एका रेल्वे कर्मचाऱ्याने एका प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. आपल्या जीवाची त्याने बिलकुल पर्वा केली नाही. ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला पाहताच त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता ट्रॅकवर उडी मारली.
खरंतर त्याने स्वतःला मृत्यूसमोरच झोकून दिलं. कारण ट्रेन अवघ्या काही अंतरावरच होती. ट्रेनच्या रुपाने मृत्यू समोरून येत होता. तरी त्याने आपल्या जीवाची बाजी लावली.
व्हिडीओत पाहू शकता प्लॅटफॉर्मवर एक रेल्वे कर्मचारी हातात हिरवा झेंडा घेऊन उभा आहे. ट्रेन येताना दिसताच तो प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावर आला. त्याचवेळी त्याचं लक्ष ट्रॅककडे गेलं. तिथं एक प्रवाशी पडला होता. त्याला पाहताच क्षणाचाही विलंब न करता या कर्मचाऱ्याने त्याच्या दिशेने धाव घेतली आणि ट्रॅकवर उडी मारली. ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला त्याने उचललं आणि ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला गेला.
हे वाचा – Electric Car Fire Video : स्कूटरपाठोपाठ आता इलेक्ट्रिक कारही पेटली; मुंबईच्या रस्त्यावर Tata Nexon EV जळून खाक
दोघंही ट्रॅकवरून बाजूला होताच ते जिथं होतं तिथं दहा सेकंदातच ट्रेन पोहोचली.
A precious life saved by on duty staff Sri H.SATISH KUMAR ,LR/PM-A/KGP at BALICHAK station on 23/06/22. pic.twitter.com/ifVx4v6V3d
— Swarnendu Das – Tv9 (@SwarnenduDas1) June 23, 2022
दोघांचंही नशीब चांगलं म्हणून ते वाचले. अगदी देवदूताप्रमाणे रेल्वे कर्मचारी प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धावून आला. प्रवाशाला त्याने मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं.
हे वाचा – VIDEO – नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू
@SwarnenduDas1 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव सतीश कुमार आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सतीश यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या हिमतीला दाद देत सर्वांनी त्यांना सॅल्युट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#VIDEO #परवशसठ #रलव #करमचऱयन #टरकवर #उड #मरतच #आल #टरन #आण