Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Video : नेमारच्या संघात सामील झाला मेस्सी; एक झलक पाहण्यासाठी पॅरिसमध्ये चाहत्यांची...

Video : नेमारच्या संघात सामील झाला मेस्सी; एक झलक पाहण्यासाठी पॅरिसमध्ये चाहत्यांची गर्दी


पॅरिस : जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने नव्या फुटबॉल क्लबशी हात मिळवणी केली आहे. फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मन (PSG)मध्ये सामील होण्यासाठी तो मंगळवारी (10 जुलै) पॅरीसमध्ये आला होता. तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. क्लबनेही न्यू डायमंड इन पॅरिस या कॅप्शनसह एक व्हिडिओ टीझर शेअर केला आहे. या व्हिडिओलाही प्रचंड पसंती मिळत आहे. पीएसजी क्लबमध्ये तो त्याचा जुना मित्र नेमारसोबत खेळणार आहे.

वाचा- ऑलिम्पिक सायकलपटूचा धक्कादायक मृत्यू; शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा

अर्जेंटिनाचा जग प्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सीने त्याच्या जुन्या क्लबला म्हणजे बार्सिलोनाला राम राम केला आहे. 21 वर्षांची सोबत सोडताना तो भावूक झाला होता. गेल्याच महिन्यात त्याने अर्जेंटिनाकडून खेळताना कोपा अमेरिकेचे जेतेपदही पटकावले होते. फ्रेंच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मेस्सीने पीएसजीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. त्यासाठी दरवर्षी तो 3.5 कोटी डॉलर इतके मानधन घेणार आहे. हा करार एक वर्ष वाढविण्याची शक्यताही आहे.

वाचा- कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या समर्थनात उतरला नीरज चोप्रा; होत आहे कौतुक

वयाच्या 13 व्या वर्षी बार्सिलोनाच्या युवा अकादमीमध्ये सामील झालेल्या मेस्सीचा करार या वर्षी 30 जून रोजी संपला. असे म्हटले जात आहे की, बार्सिलोनाची आर्थिक परिस्थिती आणि ला लीगाच्या नियमांमुळे मेस्सीला वेगळे व्हावे लागले. मेस्सीला नेहमीच बार्सिलोनासोबत राहायचे होते आणि त्यासाठी तो 50 टक्के वेतन कपातीसाठीही तयार होता, पण त्यानंतरही क्लब त्याला त्याच्यासोबत ठेवू शकला नाही.

वाचा- उद्यापासून इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी; मोठा पराभव होण्याची शक्यता

वाचा- दुसऱ्या कसोटी आधी भारतीय संघाला मोठा झटका; या गोलंदाजाला झाली दुखापत

फ्रेंच माध्यमांच्या अहवालानुसार, जर कराराच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या, तर मेस्सी शनिवारी क्लबच्या होम ग्राउंडवर उतरू शकतो. गेल्या आठवड्यात बार्सिलोना सोडल्यानंतर मेस्सीकडे आणखी दोन पर्याय होते, पण चॅम्पियन्स लीगसह प्रमुख ट्रॉफीसाठी स्पर्धा करण्याची त्यांची क्षमता पाहता मेस्सीने पीएसजीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

वाचा- ‘त्या पांड्यापासून लांब राहा’; भारताच्या सलामीवीर खेळाडूला नेटकऱ्यांनी सुनावलं

मेस्सी त्याचा जुना मित्र नेमारसोबत पुन्हा एकत्र खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मेस्सी आणि नेमार बार्सिलोनामध्ये असताना त्यांनी दोन ला लीगा, तीन कोपा डेल रे आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Video #नमरचय #सघत #समल #झल #मसस #एक #झलक #पहणयसठ #परसमधय #चहतयच #गरद

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी (गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा...

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

व्यवस्थित झोप होऊनही थकल्यासारखं वाटतंय? या 4 टीप्स वापरून बघा

मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा रात्री उशीरा काम केल्यानंतर सकाळी पुन्हा कामाला बसायचं असल्यास आपल्याला फार कंटाळा येतो. मात्र अनेकदा असं होतं...

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार?

मुंबई, 6 जुलै : ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही शिवसेना पक्षाचं विघ्न संपत असल्याचं दिसत नाही. कारण, पक्षाला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

Happy Birthday MS Dhoni these is how Captain Cool has an emotional connection with bikes vkk 95

MS Dhoni Bikes : असं म्हणतात, ‘प्रेमात असलेला माणूस आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतो. मग ते रात्री चोरून भेटणं असो किंवा मग शाहजानसारखं...