Saturday, July 2, 2022
Home भारत VIDEO - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; वरातीत जवानाचा मृत्यू

VIDEO – नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; वरातीत जवानाचा मृत्यू


लखनऊ, 23 जून : लग्न म्हटलं त्याचा आनंद, उत्साह सर्वांनाच असतो. काही लोकांचा हा उत्साह अतिउत्साहात बदलतो आणि त्यानंतर ते काय करतील याचा नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात नवरदेवाचा अतिउत्साह त्याच्या जवान मित्राच्या जीवावर बेतली आहे (Harsh gun firing by groom in wedding). नवरदेवाच्या एका चुकीमुळे लग्नाच्या वरातीत त्याच्या जवान मित्राचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे (Army jawan died in wedding after groom firing).
आर्मीत जवान असलेला बाबूलाल यादव काश्मीरमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वीच सुट्ट्या मिळताच तो यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील महुआरी या आपल्या गावी आला होता. तिथं तो आपला मित्र मनीष मद्धेशियाच्या लग्नाला गेला. नवरदेवाची वरात निघाली होती. नवरदेव घोड्यावर बसला होता. तिथं जवळच बाबूलाही खाली उभा होता. घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने उत्साहात बंदुकीतून हवेत गोळी झाडली. पण हीच गोळी बाबूलालला बसली आणि तो जमिनीवर कोसळला.
हे वाचा – भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
या घटनेचा व्हिडीओ @Benarasiyaa ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या बंदुकीतून नवरदेवाने गोळी झाडली ती बंदूक जवान बाबूलालचीच होती.

गोळी लागताच बाबूलालला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे वाचा – आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO
एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट्सगंजमधील आशीर्वाद लॉनमध्ये हे लग्न होतं. जिथं जवानाची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जवानाच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आरोपी नवरदेव मनीषला अटक करण्यात आली आहे. त्याने ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती बंदूक जप्त करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #नवरदवच #अतउतसह #बतल #मतरचय #जववर #वरतत #जवनच #मतय

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

Cashback Offers: ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

नवी दिल्ली:Airtel Offers: स्मार्टफोन खरेदी करतांना सूट व्यतिरिक्त ६ हजार रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळाला तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. महत्वाचे म्हणजे सध्या अशीच...

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

मशरूमच्या या फोटोंमध्ये लपलाय एक उंदीर, तुमच्या नजरेला सापडतोय का?

नुकतंच व्हायरल झालेल्या Optical Illusion फोटो असंच काही आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

मिशन ‘दक्षिण’, भाजपचं  हैदराबादमध्ये मंथन, पंतप्रधान मोदींसह 19 मुख्यमंत्री राहणार उपस्थित

BJP National Executive Meeting:  भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (National Executive Meeting) यावेळी हैदराबादमध्ये (Hyderabad) होत आहे. हैदराबादच्या...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी...

अनंत अंबानी का करत आहे ‘या’ मुलीवर फुलांचा वर्षाव? Video Viral

साखरपुड्याच्या चर्चांनंतर अनंत अंबानीचा खास व्हिडीओ व्हायरल, 'या' मुलीवर दिसला फुलांचा वर्षाव करताना   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...