यानंतर घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या चिरुला ठाण्याचे प्रभारी गिरीश शर्मा पाच मिनिटाच्या आतच पोलिसांच्या टीमसोबत या डॅमकडे निघाले. घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावरच रेल्वे फाटक आहे, ते संध्याकाळी बंद झाल्यावर किमान 20 ते 25 मिनिटं उघडत नाही. गिरीश शर्मा पोहोचले तेव्हा हे फाटक बंद होतं. यानंतर त्यांनी गाडी फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाच सोडली आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते डॅमकडे पोहोचले.
पाकिस्तानी तरुणामुळे राहुलला परत मिळालं हरवलेलं वॉलेट; सिनेमाप्रमाणंच आहे घटना
इकडे डॅममध्ये हेमंत स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात होता, मात्र तो बुडू लागला होता. घटनास्थळी उपस्थित असलेले काही लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. गिरीश शर्मा यांनी पोलिसांच्या मदतीनं त्या मुलाला बाहेर काढलं. यादरम्यान हेमंतला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी गेलं होतं. गिरीश शर्मा यांनी या मुलाला उचलून घेतलं आणि त्याला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धाव घेतली. यादरम्यान रेल्वे फाटकही आलं मात्र ते अजूनही बंदच होतं. अशात गिरीश शर्मा यांनी याच परिस्थितीत ट्रॅक पार केला आणि या मुलाला रुग्णालयात पोहोचवलं.
मध्य प्रदेश : पोलिसांनी वाचवला डॅममध्ये बुडणाऱ्या मुलाचा जीव pic.twitter.com/zqGDI6I2h9
— News18Lokmat (@News18lokmat) August 10, 2021
VIDEO: तरुणीसोबत पंगा घेणं पडलं महागात; बॅग चोरायला आले अन् स्वतःच कंगाल झाले
डॉक्टरांनी लगेचच या मुलावर उपचार सुरू केले. मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनी म्हटलं, की पाच मिनिटंही उशीर झाला असता, तर हेमंतचा जीव वाचवणं शक्य झालं नसतं. काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#VIDEO #डममधय #बडणऱय #मलल #रअल #सघमन #कढल #बहर #सवत #उचलन #घत #रगणलयत #पहचवल #अन #डकटर #महणल