Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Video:'हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक, मिळाल्यापासून खिशात घेऊन फिरतोय'

Video:’हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक, मिळाल्यापासून खिशात घेऊन फिरतोय’


नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमधील सर्व पदक विजेते खेळाडू भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर नीरज चोप्रा, रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, लव्हलिन बोरर्गोहेन आणि पुरुष हॉकी संघाचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर सर्व खेळाडूंचे दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अनुराग ठाकूर, किरण रिजिजू आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा उपस्थित होते.

वाचा- नीरजचे पदक चमत्कारापेक्षा कमी नाही, जाणून घ्या ८ फॅक्ट

देशाला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा सर्वप्रथम व्यासपीठावर आला आणि त्याने सुवर्णपदक सर्वांना दाखवले. तो म्हणाला, हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक आहे. ज्या दिवसापासून हे पदक मिळाले आहे तेव्हापासून मी जेवलो नाही की नीट झोपू शकलो नाही. जेव्हा जेव्हा हे पदक पाहतो तेव्हा वाटते सर्व काही ठीक आहे. पदक मिळाल्यापासून ते खिशात ठेवून फिरतोय. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल खुप खुप धन्यवाद. ऑलिम्पिक माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती आणि ती मला गमवायची नव्हती.

वाचा- मेस्सी ढसाढसा रडत म्हणाला, ५० टक्के पगार कपात करण्याची ऑफर दिली पण त्यांनी ऐकले नाही

काय म्हणाला थ्रो बद्दल नीरज

अंतिम फेरीच्या वेळी थ्रोच्या आधी मी विचार केला की मला १०० टक्के द्यायचे आहे आणि कोणाला घाबरण्याची गरज नाही. मी सर्व युवकांना हेच सांगेन की, कोणाशी घाबरू नका. पहिला थ्रो केल्यानंतर मला वाटले की तो माझ्या बेस्ट थ्रो पेक्षा थोडासा कमी आहे.

वाचा- नीरज चोप्रावर बक्षीसांची उधळण; आता इंडियन आर्मीकडून मिळणार मोठे गिफ्ट

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताने ऑलिम्पिकमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने ७ पदक जिंकली. याआधी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने ६ पदक जिंकली होत.

भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेली पदक

मीराबाई चानू, रौप्यपदक
पीव्ही सिंधू, कांस्यपदक
लव्हलिन बोर्गोहेन, कांस्यपदक
रवीकुमार दहिया, रौप्यपदक
पुरुष हॉकी संघ, कांस्यपदक
बजरंग पुनिया, कांस्यपदक
नीरज चोप्रा, सुवर्णपदकअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Videoह #मझ #नह #तर #सपरण #दशच #पदक #मळलयपसन #खशत #घऊन #फरतय

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष! ; भारत-इंग्लंड पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या...

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

Todays Headline 7th July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...