<p> ज्ञानवापी मशिदीची व्हीडिओग्राफीचा मार्ग मोेकळा झालाय. मुस्लिम पक्षकारांची कोर्ट कमिशनर बदलण्याची मागणी वाराणसी कोर्टानं फेटाळली आहे. कोर्ट कमिशनर अजय कुमार यांच्या साथीला आणखी दोन सहायक कोर्ट कमिशनर नियुक्त केले आहेत. ज्ञानवापी मशिद नसून त्यात मंदिराचे अवशेष असल्यानं ते मंदिर आहे, असा दावा करण्यात आलाय. या परिसरात व्हीडिओग्राफी करण्यासाठी कोर्ट कमिशनर नेमण्यात आलेत. कोर्ट कमिशनरना बदलण्याची मागणी मुस्लिम पक्षकारांनी केली होती. ती फेटाळत कोर्टानं ज्ञानवापी परिसरात व्हीडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. टाळं उघडलं नाही तर तोडून व्हीडिओग्राफी करा, असे आदेश कोर्टानं दिलेत. कोर्ट कमिशनर १७ मेपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहेत. </p>
<p> </p>
<pre id="tw-target-text" class="tw-data-text tw-text-large tw-ta" dir="ltr" data-placeholder="Translation"> </pre>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Varanasi #जञनवप #मशदच #टळ #उघडल #नह #तर #तडन #वहडओगरफ #कर #करटच #आदश