Monday, July 4, 2022
Home भारत Unnao Rape Case: गरज असेल तरच घराबाहेर पडा; उन्नाव बलात्कार पीडितेला कोर्टाचे...

Unnao Rape Case: गरज असेल तरच घराबाहेर पडा; उन्नाव बलात्कार पीडितेला कोर्टाचे निर्देश


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: उन्नाव बलात्कार प्रकरणात (Unnao Rape Case) सुनावणी करणाऱ्या न्यायालयानं सोमवारी एक मोठा निर्देश दिला आहे. न्यायालयानं बलात्कार पीडितेला सुनावणी पूर्ण होईपर्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर जावं, तसेच कुठेही जाण्यापूर्वी तिच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी, असा आदेश दिला आहे. उन्नाव बलात्कार पीडितेला सीआरपीएफचं (CRPF) संरक्षण मिळालं आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा (Justice Dharmesh Sharma) यांनी हे निर्देश दिले आहेत.

खरंतर, वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप करत उन्नाव बलात्कार पीडितेनं न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यानंतर न्यायालयानं हे निर्देश जारी केले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा म्हणाले की, ‘ पीडितेनं कुठेही जाण्यापूर्वी सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. ते तुमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच दररोज घराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, अशाप्रकारचं नियोजन आपण करावं. गरज असेल तेव्हाच बाहेर जावा. तसेच ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत सावध राहा, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-15 वर्षांपूर्वी झाले होते मुस्लीम, 18 जण परतले हिंदू धर्मात
उन्नाव बलात्कार पीडित आणि सुरक्षा अधिकारी सहमत
या व्यतिरिक्त, न्यायालयानं म्हटलं आहे की बलात्कार पीडित आणि तिचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी हे प्रकरण सामंजस्यानं सोडवण्यास सहमत झाले आहेत. त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, जर पीडित किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना संबंधित प्रकरणांसाठी आपल्या वकीलाला भेटायचं असेल तर त्यांनी एक दिवस अगोदर याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
हेही वाचा-उच्चाधिकारी लेकीला पाहून इन्स्पेक्टर बापाचं उर आलं भरून; सॅल्युट मारतानाचा PHOTO
उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपचा बडतर्फ आमदार कुलदीप सिंह सेंगर सध्या तुरुंगात आहे. त्यानं 2017 मध्ये पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता आणि पीडित मुलगी त्यावेळी अल्पवयीन होती. याप्रकरणी न्यायालयानं 20 डिसेंबर 2019 रोजी सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय, 2019 मध्ये कोर्टानं सीआरपीएफला बलात्कार पीडित मुलगी, तिची आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले होते. उन्नाव बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातून भाजपवर टीका करण्यात आली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Unnao #Rape #Case #गरज #असल #तरच #घरबहर #पड #उननव #बलतकर #पडतल #करटच #नरदश

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा

मुंबई, 04 जुलै : जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...