Monday, July 4, 2022
Home भारत Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द जशाचा तसा... वाचा...

Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द जशाचा तसा… वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो असं ते म्हणाले. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह असल्याने माझा चेहरा असा आहे. आता शिवसेनेवर आलेल्या संकटामुळे माझा चेहरा असा झाला असं काहीजण बोलतील. कोरोना काळा बाका होता, त्यावेळी आपण लढलोय. अशा कठीण काळात प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाट्याला अनेक गोष्टी आल्या…. पण मी प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे देशातल्या टॉप पाच मुख्यमंत्र्यामध्ये समावेश माझा समावेश झाला. 

आता वेगळा मुद्दा…मुख्यमंत्री भेटत नव्हते असं अनेकजण तक्रार करतात. मी भेटत नव्हतो, कारण शस्त्रक्रिया झालेली होती. तो अनुभव वेगळा, त्यामुळे भेटणं शक्य नव्हतं. …पण काम झालं. 
शिवसेना आणि हिंदुत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही. हिदुत्व हा आमचा श्वास, अयोध्येला शिवसैनिक गेले. हिंदुत्वाबद्द्ल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. काहीजण म्हणतात बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. … पण आता काय वेगळं झालं….बाळासाहेबांचा विचार मी पुढे नेतोय. मधल्या काळात जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनं दिलं,,, ते लक्षात ठेवा

आताच्या परिस्थितीच्या खोलात मला जायचं नाही….विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर मी चर्चा केली, आपली माणसं आपल्याला एकत्र ठेवावीत लागली … ही कुठली लोकशाही, मला पटत नाही

मला कसलाही अनुभव नाही, पण प्रामाणिकपणे, जिद्दीने काम करणार. गेली 25 -30 वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात लढलो. पण परिस्थिती अशी आली की त्यांच्यासोबत जावं लागलं…. पवार साहेबांनी सांगितलं की जबाबदारी तुला घ्यावी लागेल
पवारसाहेबांनी विश्वास टाकला, सोनियांनी विश्वास टाकला. मग कोणताही अनुभव नसताना मी जबाबदारी घेतली…..प्रशासन सांभाळत सर्व कामं केली

मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं….सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं…. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,,, असं तोंडावर सांगावं

माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत… तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन…. 

ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे…. ते सांगावं ,,, हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार…. माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे….

गायब आमदारांनी माझं हे लाईव्ह पाहावं… आणि मला सांगावं… मी पद सोडेन,,,,, तोंडावर सांगाव. मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी कितीजण तिकडे गेले….. त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मत केलं तर ते माझ्यासाठी लाजीरवाणे असेल. त्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, मी तयार आहे. 

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Uddhav #Thackeray #Live #उदधव #ठकरच #शबद #न #शबद #जशच #तस #वच #कय #महणल #मखयमतर

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Kullu Bus Accident : हिमाचलल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असेल खास; असा जाईल दिवस

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक...