मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली. या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
हे सरकार आता पडेल मग पडेल. याचा विचार करत आहे. पिकलेले आंबे पडले आहे पण सरकार काही पडले नाही. मग शिवसेना यांच्यासोबत जाणार, शरद पवार यांच्यासोबत जाणार, काँग्रेस सोडून जाणार असं तडाखे यांनी बांधले, पण काहीच होत नाही. मग ईडी मागे लावं, सीबीआय मागे लावं, तरी फुटतं नाही. एक सांगतो, तुम्ही जर येड्या वाकड्या वाटेनं आणि खोटे गुन्हे दाखल करून आमच्या माणसाच्या मागे लावणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. हा महाराष्ट्र जो पेटेल, पळता भुई थोडी करून सोडणार नाही. हा महाराष्ट्र मेल्या आईचा दूध प्यायलेला नाही. आमच्या मागे लागेल तर सोडणार नाही .कायद्याचा दूरउपयोग करू नका, आम्हीही करत नाही. जर लढायचे असेल तर समोरून या. सरकार कोण करेल, ही जनता ठरवले, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
हे गलिच्छ राजकारण सोडा, नीट वागा, शेजारील लंका कुणी पेटवली तर सामान्य लोकांनी पेटवली आहे. हिंदुत्व हे घर पेटवणारे नसावे, घरातली चूल पेटवणारी असावी. घर पेटवणे सोपे आहे, दंगली पेटवून काय भेटणार आहे. घर विझवता आलं पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे.मंदिरे आमची आणि त्यांचा अडथळा आणणारे टिकोजीराव कोण तुम्ही, अशा खात्यांना पुरलं पाहिजे, तुम्ही देखरेख करा, इथं काय पंतप्रधान आवास योजना नाही, एफएस वैगेरे प्रकार नाही. काही मंदिरं पाण्यात जातात. त्यांची देखभाल केली जात नाही, त्यांची देखभाल कऱण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याची देखभाल करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे. कांजूरमार्गची जमीन अडवून बसले त्याबद्दल बोलावे, धारावीची जमीन देता येत नाही म्हणून केंद्राने अनेक प्रकल्प अडवून ठेवले. फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही, इतके हे करंटे सरकार आहे. जा तिथे जाऊन बोलावे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Uddhav #thackeray #तर #ह #महरषटर #ज #पटल #उदधव #ठकरच #भजपल #इशर