Saturday, May 21, 2022
Home टेक-गॅजेट UAE President : शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यूएईचे नवे अध्यक्ष

UAE President : शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यूएईचे नवे अध्यक्ष


UAE President Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan  : संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनानंतर यूएईचे अध्यक्ष कोण होणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्यानंतर आता यूएईचे अध्यक्षपद प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे देण्यात आलं आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे तिसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत. 

संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचे काल  73 वर्षी निधन झाले.  शेख खलिफांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशात आज यूएईचे नवे अध्यक्ष घोषित करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा हे आजारी होते. त्यांचा सरकारी कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी वावर हा खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यूएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. शेख खलिफा हे यूएईचे दुसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 16 वे शासक होते. ते शेख झाएद यांचे सर्वात मोठे अपत्य होते. जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

UAE : यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे 73 व्या वर्षी निधन, चार दिवसांचा दुखवटा जाहीर

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#UAE #President #शख #महममद #बन #झयद #अल #नहयन #यएईच #नव #अधयकष

RELATED ARTICLES

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Most Popular

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...