Saturday, May 21, 2022
Home टेक-गॅजेट UAE : यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे 73 व्या वर्षी निधन, चार...

UAE : यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे 73 व्या वर्षी निधन, चार दिवसांचा दुखवटा जाहीर


UAE President Sheikh Khalifa Dies : संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचे आज निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज अध्यक्ष शेख खलिफांच्या मृत्यूची बातमी जाहीर केली आहे. शेख खलिफांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्या आलं आहे. या काळात सर्व सरकारी कार्यालयावरचे ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून सर्व कार्यालयं आणि खासगी कंपन्याही बंद ठेवण्यात येणार आहेत.  

शेख खलिफा हे गेल्या काही वर्षांपासून आजारपणाशी झुंजत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद हे यांच्याकडे यूएईची सूत्र जाण्याची शक्यता आहे. शेख खलिफांच्या मृत्यूनंतर अद्याप यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा यांचा सरकारी कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी वावर हा खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यूएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. 

जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#UAE #यएईच #अधयकष #शख #खलफ #यच #वय #वरष #नधन #चर #दवसच #दखवट #जहर

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

गावस्करांकडून ‘गलती से मिस्टेक’, कॉमेंट्री करताना हे काय बोलून गेले सुनील गावस्कर

खेळाडूवर पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ

श्रीनगर, 20 मे : रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याच्या जागेवर ताज्या भूस्खलनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. जवळच्या डोंगराचा एक भाग...

लग्नाला जाण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार

बलरामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे....

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....