Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Twitter वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येणार 'हे' नवं फीचर

Twitter वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येणार ‘हे’ नवं फीचर


नवी दिल्ली, 23 जून : आजकाल लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक प्लॅटफाॅर्म मिळत आहेत. त्यामुळे लोक आपलं मत, आपले विचार मनमोकळेपणाने मांडू शकतात. या प्लॅटफाॅर्मपैकी सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्लॅटफाॅर्म आहे. यामध्ये व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. ट्विटरवर (Twitter latest news) आपण कलाकार, राजकारणी, सामान्य लोक, अशा सगळ्यांचेच विचार, मतं वाचत असतो. मात्र याठिकाणी लिहिण्याला शब्दांची मर्यादा आहे. त्यामुळे आपण ट्विटरवर काही ठराविक शब्दांमध्येच आपलं मत मांडू शकतो. अशातच ट्विटरनं एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटर वापरकर्त्यांसाठी ही एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

हे ही वाचा – ‘आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत!’ शिवसेना आमदाराचा ‘लेटरबॉम्ब’, वाचा खळबळजनक पत्र

ट्विटर नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. त्यामुळे ट्विटर वापरायला सोयीस्कर आणि सोपं होतं. अशातच ट्विटर आता नवीन फीचर (New Feature) घेऊन येत आहे. याविषयी ट्विटरनं मोठी घोषणाही केली असून ट्विटरच्या नवीन फीचरचं नाव ‘ट्विटर नोट्स’ (Twitter Notes) असं आहे. या नव्या फीचरचा उपयोग ट्विटरवर मोठा मजकूर लिहिण्यासाठी होणार आहे. याची अद्याप चाचणी सुरु असून ट्विटरनं याविषयी ट्विट केलं आहे. त्यामुळे आपल्य सर्वांना लवकरच ट्विटरवर मोठा मजकूरही लिहिता येणार आहे.

‘ट्विटर नोट्स’ वर आपल्याला मोठा मजकूर म्हणजेच एक प्रकारे ब्लाॅग लिहिता येणार आहे. ब्लॉग पोस्टला पब्लिश केल्यानंतर तुम्ही ती लिंक शेअरसुद्धा करू शकतात. साधारण हे फीचर कसं दिसेल याचा नमुना ‘Twitter Write’ या अधिकृत साईटवर देण्यात आला आहे. यावर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. अनेक वापरकर्ते हे वापरण्यासाठी उत्सुक असलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे चाचणी पूर्ण झाल्यावर लवकरच आपल्याला या फीचरचा लाभ घेता येणार आहे.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Twitter #वपरकरतयसठ #आनदच #बतम #लवकरच #यणर #ह #नव #फचर

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...

माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

<p><strong>Pune News: &nbsp;</strong>पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी...

लोकं नको म्हणत असताना दुचाकी चालकाचं भलतं धाडस! पुरातील धक्कादायक Video व्हायरल

मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, देवासमधील एका दुचाकीस्वाराचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत...

Indian Railways Rule: रेल्वे बर्थ संदर्भात नवे नियम! प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा अडचण

नवी दिल्ली : Indian Railways Rule: तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी, तुमच्याकडे बर्थ निवडीचा...