Thursday, May 26, 2022
Home भारत TRP बाबत माहिती प्रसारण खात्याच्या निर्णयाला NBDA चा पाठिंबा

TRP बाबत माहिती प्रसारण खात्याच्या निर्णयाला NBDA चा पाठिंबा


नवी दिल्ली, 13 जानेवारी: देशातील वृत्तवाहिन्यांचे (News Channels) टीआरपी (TRP) सुरु करण्याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या (I&B department) निर्णयाला पाठिंबा (Support) देत असल्याचं न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशननं (NBDA) म्हटलं आहे. टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, शास्त्रोक्तपणा आणून त्यातील कमतरता दूर कऱण्याच्या दिशेनं सरकारनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह असल्याचं NBDA नं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

सुधारणांचं स्वागत

टीआरपी मोजणारी संस्था BARC च्या कारभारात सुधारणा होण्यासाठी सुचवण्यात आलेले उपाय योग्य असून NBDA नं केलेल्या सूचनांचा गांभिर्यानं विचार करण्यात आल्याबद्दल संघटनेनं समाधान व्यक्त केलं आहे. टेलिव्हिजनसाठीचा टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत त्रुटी आहेत, ही बाब माहिती आणि प्रसारण खात्यानं मान्य केल्याबद्दल संघटनेनं सरकारचे आभार मानले आहेत. 

पुनर्रचना गरजेचीच

BARC ची पुनर्रचना करण्याचा निर्णय़ हा अत्यंत आवश्यक होता, असं म्हणत संघटनेकडून सरकारनं सुचवलेल्या बदलांचं स्वागत करण्यात आलं आहे. बार्कच्या बोर्डाची पुनर्रचना, टेक्निकल कमिटीची पुनर्रचना, स्वतंत्र सदस्यांची नियुक्ती आणि पर्मनंट ओव्हरसाईट कमिटी या बाबींमुळे टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास संघटनेनं व्यक्त केला आहे.

जॉइंट वर्किंग ग्रुप

प्रसार भारती सीईओंच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणारा संयुक्त कृती गट म्हणजेच जॉइंट वर्किंग ग्रुप हा रिटर्न पाथ डेटा म्हणजेच RPD बाबत सूसूत्रता आणण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास NBDA नं व्यक्त केला आहे. 

सुधारणांना वाव

सध्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या सूचनांनुसार BARC नं स्विकारलेल्या सुधारणा स्वागतार्ह आहेतच, मात्र त्याशिवाय इतरही अनेक सुधारणांना वाव असल्याचं NBDA नं म्हटलं आहे. टीआरपीच्या प्रक्रियेत कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही, यासाठी प्रक्रिया अधिक सक्षम आणि सुरक्षित करणं गरजेचं असल्याचं मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आलं आहे. BARC नं सँपल साईज वाढवण्याची गरज असल्याचंही NBDA नं म्हटलं आहे. 

Published by:desk news

First published:

Tags: Central government, Trp meterअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#TRP #बबत #महत #परसरण #खतयचय #नरणयल #NBDA #च #पठब

RELATED ARTICLES

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पुरेसे संरक्षण देते का?

Health Insurance Policy : वर्षागणिक वैद्यकीय खर्चात वाढ होत असल्याने पॉलिसीधारकाने त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (आरोग्य विमा पॉलिसी)ची...

Most Popular

चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली दीड वर्षांची चिमुकली; पण साधं खरचटलंही नाही

डेहराडून, 25 मे : काहींना चालता-बोलता, हसता-खेळता मृत्यू गाठतो तर काहींसोबत जीवघेणी दुर्घटना होऊनही त्यांना काहीच होत नाही. अशीच एक चमत्कारिक घटना सध्या चर्चेत...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… ब्लॅक अँड गोल्डन ड्रेस, दीपिकाच्या लूकवर चाहते फिदा!

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | क्वालिफायर 2 | नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद - 27...

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुंबईत पुन्हा निर्बंध? पालकमंत्र्यांनी केलं मोठं विधान

मुंबई, 26 मे : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ (Coronavirus cases increasing in Mumbai) होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अशीच...

26th May 2022 Important Events : 26 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

26th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

Anil Parab Chembur ED Raid : अनिल परबांच्या संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी छापेमारी

<p>अनिल परबांच्या संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी छापेमारी. सकाळपासून परबांशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...