Saturday, July 2, 2022
Home करमणूक TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या – 

अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार  यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे. 

मराठी सिनेसृष्टीचे महानायक अशोक सराफ येणार ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ (Ashok Saraf) ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सहभागी होणार आहेत. 

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती; वरुण सुखराज करणार दिग्दर्शन

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव आहे… ‘शाहू छत्रपती’. 

‘भूल भुलैया 2’ अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. 

ज्यांचा कडक असेल डान्स त्यांना मिळेल चान्स; चिंचि चेटकीन शोधणार लिटिल मास्टर्स

‘डान्स महाराष्ट्र डान्स’हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी लवकरच ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा कथाबाह्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी असणार आहे. 

‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागात दिसणार सारा अली खान आणि जान्हवी कपूर

सिने निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिसणार आहेत. 7 जुलैला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज

मार्वल स्टुडिओचा बहुचर्चित ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा दुसरा भाग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 6 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. 

‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’गाणं रिलीज

सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या 15 जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. ‘वाघ आला’ चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. 

सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं हटवलं सोशल मीडियावरुन ‘जाधव’ आडनाव, चर्चांना उधाण

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी निभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. 

‘भूल भुलैया 2’ अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#TOP #Entertainment #News #दवसभरतल #दह #महततवचय #मनरजनवषयक #बतमय

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

मुंबई :  राज्यात आज 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4189  रुग्ण कोरोनामुक्त...

करण जोहरला मोठा धक्का,’या’ दोन स्टार्सनी नाकारली Koffee With Karanची ऑफर!

करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

5G Smartphones: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही लिस्ट एकदा पाहाच, सुरुवातीची किंमत ८,९९९ रुपये

नवी दिल्ली: Budget 5G Smartphone: जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर, आज आम्ही तुम्हाला १५ हजारांखालील टॉप ५...

वसंतराव नाईक यांची जयंती; शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान, कृषी दिनाचा इतिहास काय?

Maharashtra Krushi Day 2022 : राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै...

हार्दिकचे एकदिवसीय संघात पुनरागमन

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या आगामी प्रत्येकी तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी गुरुवारी भारताचे संघ जाहीर करण्यात आले. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे एकदिवसीय संघात पुनरागमन...