TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या –
Oscars Awards 2023 : 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले असते. 2022 चा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. 2022 मध्ये कोडा सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. आता 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर झाली आहे. 13 मार्च 2023 रोजी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
‘धर्मवीर’ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने 2.5 कोटींची कमाई केली आहे.
ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
‘द आर्चीज’चं पोस्टर प्रदर्शित
आजकाल अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान , बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
‘वाय’ नक्की आहे तरी काय ? मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत
‘वाय’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सत्य घटनांवर आधारित सिनेमा असणार आहे. कल्पनेपलिकडील वास्तवाची ‘ती’ च्या लढ्याची गोष्ट ‘वाय’ सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजित वाडीतरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुसा सांभाळली आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे.
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू
मल्याळम अभिनेत्री आणि मॉडेल सहानाने शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला आहे. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच सहानाच्या पत्नीनेच तिची हत्या केल्याचा आरोप सहानाच्या कुटुंबियांनी केला आहे.
‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ सिनेमा लवकरच प्रदर्शित
‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या सिनेमाची घोषणा झाली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित हा सिनेमा आहे. राहुल जाधव यांनी ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अभिमन्यू दासानीच्या ‘निकम्मा’चे मोशन पोस्टर रिलीज
अभिनेता अभिमन्यू दासानीने त्याच्या आगामी ‘निकम्मा’ सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या सिनेमात अभिमन्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, विनोद, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे.
सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा
बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावर्षी ‘भाईजान’चा नवा चित्रपट न आल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. सलमान खानने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षय कुमाक कान्स चित्रपट महोत्सावात हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#TOP #Entertainment #News #दवसभरतल #दह #महततवचय #मनरजनवषयक #बतमय