टोमॅटो फ्लू नेमका आहे तरी काय?

टोमॅटो फ्लू, ज्याला टोमॅटो फिवर म्हणूनही ओळखले जाते. या फ्लूने संसर्गित झालेल्या मुलांमध्ये कोणतेही निदान न झालेला ताप दिसून येतो. याच्या संसर्गामुळे शरीराच्या अनेक भागात फोड किंवा जखमा दिसू लागतात. या फोडांचा आकार सामान्यतः लाल असतो म्हणून त्याला टोमॅटो फ्लू असे नाव दिले आहे. डॉक्टरांच्या मते, टोमॅटो फ्लू व्हायरल इनफेक्शन आहे की चिकनगुनिया किंवा डेंग्यूच्या संसर्गामुळे होते हे सांगणे कठीण आहे.
(वाचा :- What causes Cancer : हेल्दी शरीरात कॅन्सरला जन्म देतात ‘या’ 5 गोष्टी, माहित असूनही लोक सोडत नाहीत 2 नंबरची अतिभयंकर सवय..!)
टोमॅटो फ्लू झाल्यावर दिसू लागतात शरीरात ही लक्षणं

- शरीरावर लाल पुरळ उठणे
- त्वचेत जळजळ आणि खाज सुटणे
- डिहायड्रेशन
- थकवा
- सांधे आणि शरीरात वेदना
- उच्च ताप
- हात, गुडघे आणि नितंबांचा रंग बदलणे
- पोटात तीव्र वेदना होणे
- उलट्या आणि अतिसार
- सर्दी आणि खोकला
(वाचा :- World Hypertension Day : हे ५ बदल दर्शवतील तुम्ही पडलात हायपरटेन्शनचे बळी, आजच बदला या सवयी)
पालकांनी असा करावा मुलांचा बचाव

तुम्हाला तुमच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा. आणि या लक्षणांना सामान्य समजू नका किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वाचा :- रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास येईल हार्ट अटॅक, करा न्युट्रिशनिस्टने सांगितलेले ‘हे’ 5 स्वस्त व रामबाण उपाय..!)
मुलांना द्या भरपूर पाणी

सर्वसाधारणपणे, डॉक्टरांनी टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या मुलांना भरपूर व स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या मते, शरीरावरील लाल पुरळ आणि अल्सर यांची स्वच्छ पाण्याने नियमित साफसफाई केल्यास मोठा आराम मिळतो. तसेच, या जखमांना नखांनी खाजवणे किंवा खरडण्यास सक्त मनाई केली आहे. हा संसर्ग पसरण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळे त्याच्या परिणामांबद्दल फार काही सांगता येत नाही. त्यामुळेच डॉक्टरांनी टोमॅटो फ्लूच्या रुग्णांपासून पुरेसे अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे.
(वाचा :- Monkeypox : भय इथले संपत नाही, कोरोनानंतर आता मंकीपॉक्स व्हायरसचा धुमाकूळ, ‘ही’ लक्षणे ओळखा व ताबडतोब व्हा सावध..!)
मुलांची अशी घ्या काळजी

- मुलाला फोडांना नख लावू देऊ नका.
- संक्रमित मुलांना हायड्रेटेड ठेवा.
- योग्य स्वच्छता राखा.
- संक्रमित मुलांशी जवळचा संपर्क टाळा.
- संक्रमित मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घाला.
- रोगाचा दीर्घकाळ राहणारा परिणाम टाळण्यासाठी मुलांना योग्य विश्रांती घेण्यास सांगा.
(वाचा :- World Hypertension Day : औषधं खाण्याची अजिबात गरज नाही, ‘या’ 5 सोप्या पद्धतींनी करा ब्लड प्रेशर कंट्रोल..!)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Tomato #fever #वयसरखय #पसरणय #टमट #फल #ससरगच #करळमधल #लहन #मलन #बध #ह #आहत #गभर #लकषण #उपचर #कय