Monday, July 4, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल

Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल


टोकयो, 5 ऑगस्ट : भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिकमध्ये हॉकीत मेडल मिळवले आहे.
या मॅचमध्ये जर्मनीनं आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीच्या ऊरजनं फिल्ड गोल करत  1-0 नं आघाडी मिळवली. भारताला 5 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रुपिंदर पाल सिंह गोल करण्यात अपयशी ठरला. दोन्ही टीम  सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत होत्या. सातव्या मिनिटाला जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न गोलकिपर श्रीजेशनं उधळला. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीकडं 1-0 अशी आघाडी होती.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये 5 गोल
जर्मनीच्या टीमनं 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. तर 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. भारतीय टीमला 41 वर्षांपासून ऑलिम्पिक मेडलची प्रतीक्षा आहे. या मोठ्या फरकानंतरही भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये जोरदार खेळ केला.
सिमरनजीत सिंहनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 24 व्या मिनिटाला जर्मनीच्या निकोलस वेलननं गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनीच जर्मनीनं आणखी एक गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. भारतीय टीमनं 2 गोलच्या पिछाडीनंतरही जिद्द सोडली नाही. हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी 2-3 नं कमी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी
भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटात दोन गोल करत बरोबरी साधली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने जोरदार सुरुवात केली. भारताकडून 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये पहिल्यांदाच टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 5 मिनिटांनीच सिमरनजीत सिंहनं गोल करत 5-3 अशी आघाडी घेतली. हा भारताचा मॅचमधील सलग चौथा गोल होता. त्यानंतर जर्मनीनं काही पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्या पेनल्टीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले.
IND vs ENG : पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला झटपट गुंडाळल्यानंतर भक्कम सुरूवात
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीतील चुकांचा फायदा घेत जर्मनीनं चौथा गेला. जर्मनीकडून लुकासनं हा गोल केला. त्यानंतर मनदीप सिंहला गोल करण्याची एक संधी साधता आली नाही. मात्र भारतानं अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत ऑलिम्पिक मेडलवर शिक्कामोर्तब केलं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #वरषन #आल #ऐतहसक #कषण #भरतल #हकमधय #मडल

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

100 Days of Yogi Government: ५०० एन्काउंटर, १९२ कोटींची संपत्ती जप्त…; योगी सरकारचे १०० दिवसांतील धडाकेबाज निर्णय

100 Days of Yogi Government: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार मार्च २०१७मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलं. २०१७ ते २०२२पर्यंतच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारकडून...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....