Saturday, August 13, 2022
Home भारत Tokyo Olympics 2021: देशाला मुलींचा अभिमान! संसदेतही सिंधू, महिला हॉकी टीमवर कौतुकाचा...

Tokyo Olympics 2021: देशाला मुलींचा अभिमान! संसदेतही सिंधू, महिला हॉकी टीमवर कौतुकाचा वर्षाव


हायलाइट्स:

  • भारताच्या मुली! भारताचा अभिमान!
  • संसदेतून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव
  • संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा

नवी दिल्ली : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दोन आठवड्यांत कृषी कायदे तसंच पेगॅसस प्रकरणामुळे फारसं कामकाज होऊ शकलं नाही. आज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात अगोदर भारतीय महिला हॉकी टीम तसंच बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू याचं कौतुक करत या शुभेच्छा देण्यात आल्या.

भारतीय महिला हॉकी टीमला शुभेच्छा

संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांत अध्यक्षांनी भारतीय महिला हॉकी टीमला शुभेच्छा दिल्या. महिला हॉकी टीमनं आपल्याहून अधिक मजबूत आणि तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलिया टीमला १-० अशा फरकानं धूळ चारली. याचसोबत महिला हॉकी टीमनं ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच महिला हॉकी टीम सेमीफायनलपर्यंत पोहचली आहे.

चक दे इंडिया, भारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास, सुवर्णपदकापासून फक्त दोन पावले दूर…
पराभूत होऊनही भारताच्या दुती चंदने रचला विक्रम, जाणून घ्या…
सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव; PM मोदी म्हणाले, ‘सिंधू भारताचा गर्व आहे’

पी व्ही सिंधूलाही शुभेच्छा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देण्याऱ्या भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिलाही संसदेत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कास्य पदकाच्या लढतीत सिंधूनं चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून देशाला पदक जिंकून दिलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूचं हे ऑलिम्पिकमधलं दुसरं पदक ठरलंय. याआधी सिंधुनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं.


महिला हॉकी संघानं रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचलाय. उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया टीमला १-० अशा फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलंय. या विजयासह भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. महिला संघ आता सुवर्ण पदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे.

जम्मू काश्मीर : दंगेखोरांना पासपोर्ट-सरकारी नोकरी मिळणार नाही
Covid19: सावध राहा! करोना रुग्णांची दैनिक संख्या अजूनही ४० हजारांच्या घरात
e-RUPI: पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या कसा होणार ‘ई-रुपी’चा वापरअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Tokyo #Olympics #दशल #मलच #अभमन #ससदतह #सध #महल #हक #टमवर #कतकच #वरषव

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

Most Popular

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...