Saturday, August 13, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics 2020 : लवलीनाच्या बॉक्सिंगमुळे भारताला कांस्यपदक, विश्वविजेता बॉक्सरकडून पराभूत

Tokyo Olympics 2020 : लवलीनाच्या बॉक्सिंगमुळे भारताला कांस्यपदक, विश्वविजेता बॉक्सरकडून पराभूत


मुंबई : टोक्यो ओलंपिकच्या बॉक्सिंग रिंगमध्ये भारताची लवलीना बोरगोहेनला (Lovlina Borgohain)  कांस्यपदावरच समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिचा विश्वविजेता तुर्की बॉक्सर बुसानाजने पराभव केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी पदक जिंकणारी लवलीनाही दुसरी महिला बॉक्सर आहे.

त्याच्या आधी विजेंदर सिंगने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर मेरी कॉमने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.  त्यामुळे तसे पाहाता ती भारतासाठी बॉक्सींगमध्ये मेडल आणणारी 3री खेळाडू आहे. लवलीनासाठी आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की, ती तिच्या आयुष्यातील पहिला ऑलिम्पिक खेळत असतानाच तिने भारतासाठी कांस्यपदक मिळवलं आहे.

तुर्कीच्या बॉक्सरने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवल्याचे दिसत होते. लवलीनाने तिचा गार्ड उघडा ठेवला, ज्याचा पूर्ण फायदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने उपांत्य फेरीच्या सामन्यात घेतला.

बुसानाजे पंच लवलीनाविरुद्ध सरळ निशाण्यावर लागत होते, ज्याचे गुण तिला मिळाले. अधिक अनुभवी तुर्की बॉक्सरच्या पंचंना भारतीय बॉक्सरकडे उत्तर नव्हते. तिच्या वजनाच्या गटात अव्वल मानांकित बुसानाजने तिन्ही फेऱ्यात आपला खेळ दाखवून जजेसची मन जिंकली.

वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणाऱ्या लवलीनाला विजेंद्र आणि मेरी कॉमला मागे टाकण्यासाठी पूर्ण संधी होती. परंतु अखेर ती, या दोघांना पाठी सोडू शकली नाही. ज्यामुळे भारताला पुन्हा एकदा ऑलिम्पिक बॉक्सिंग रिंगमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या शुक्रवारी, लवलीनाने चीनी ताइपे बॉक्सरचा 4-1 असा पराभव करून कांस्यपदक मिळवले होते.

लवलीनाच्या कारकीर्दीतील 10 वा पराभव

23 वर्षीय भारतीय बॉक्सर लवलीनाच्या कारकीर्दीतील हा 10 वा पराभव आहे. त्याचबरोबर तिने आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे, तुर्कीच्या बुसानजने उपांत्य फेरीत तिचा पराभव केल्यानंतर आपला 26 वा विजय नोंदवला आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #लवलनचय #बकसगमळ #भरतल #कसयपदक #वशववजत #बकसरकडन #परभत

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...