Monday, July 4, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : हॉकीतील भारताच्या विजयाचं वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा...

Tokyo Olympics : हॉकीतील भारताच्या विजयाचं वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा इमोशनल VIDEO


मुंबई, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या पुरुष हॉकी (Indian Men’s Hockey Team) टीमनं रविवारी इतिहास घडवला. भारतानं क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा 3-1 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. 1972 नंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय टीमनं 49 वर्षांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारतामध्ये ऑलिम्पिक सामन्यांचं Live प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्सवर करण्यात येत आहे. सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय हे दोघं जण रविवारच्या मॅचची हिंदी कॉमेंट्री करत होते. रविवारी मॅच संपण्याची शिट्टी वाजली आणि गेल्या 49 वर्षांपासून भारतीय हॉकी फॅन्सनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. भारताची टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणी सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय हे दोघे जणं अक्षरश: आनंदानं रडू लागले.
या दोघांनाही Live कॉमेंट्रीचा मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी देखील अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक सामन्यांची कॉमेंट्री केली आहे. तरीही रविवारचा विजय हा त्यांच्यासाठी खूपच इमोशनल होता. भारताच्या हॉकी टीमनं 49 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साखळी सामन्यामधे मोठा पराभव झाल्यानंतर भारत इथवर मजल मारेल अशी कल्पना खूप कमी जणांनी केली होती. सामना जिंकल्यानंतर कॉमेंट्री करताना सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय या दोघांनाही अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या या इमोशनल कॉमेंट्रीचा व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण…
भारताकडून रविवारच्या सामन्यात दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला, तर ब्रिटनकडून एकमात्र गोल वॉर्डने केला. 3 ऑगस्टला भारत आणि बेल्जियम यांच्यात सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. बेल्जियमने क्वार्टर फायनलमध्ये स्पेनचा 3-1 ने पराभव केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये सामना रंगेल.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #हकतल #भरतचय #वजयच #वरणन #करतन #रड #लगल #कमटटर #पह #इमशनल #VIDEO

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...