Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : भारताला ऑलिम्पिकमध्ये 5 मेडल! पाकिस्तानला किती आहेत माहिती आहे...

Tokyo Olympics : भारताला ऑलिम्पिकमध्ये 5 मेडल! पाकिस्तानला किती आहेत माहिती आहे का?


टोकयो, 5 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) संपण्यासाठी आता काही दिवसांचा कालावधी उरला आहे.भारतीय टीमनं यावेळी वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि हॉकी या चार खेळात मेडल जिंकले आहे. तर रवी कुमार दहिया  (Ravi Kumar Dahiya)  कुस्तीमध्ये फायनलला गेल्यानं पाचवं मेडल नक्की झालंय. उरलेल्या काही दिवसांमध्येही भारताला मेडलची आशा आहे. त्यामुळे ही स्पर्धा संपेपर्यंत एकूण मेडलमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
भारताला टोकयो ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) मिळवून दिलं. मीराबाईनं 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत हे मेडल जिंकले. मीराबाईनं स्नॅच गटात 87 आणि क्लीन अँड जर्क गटात 115 किलो वजन उचललं. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी Mirabai Chanu wins Silver Medal) ती पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
मीराबाई चानूनंतर (Mirabai Chanu) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली ब्रॉन्झ मेडल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. सिंधूने याआधी रियो ऑलिम्पिकमध्ये 2016 साली सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.
महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) ब्रॉन्झ मेडलची कमाई केली.  गेल्या नऊ वर्षांत ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगसाठी मिळालेलं हे पहिलं पदक आहे. लवलीना नंतर भारताच्या पुरुष हॉकी टीमनं (Indian Men’s Hockey Team) जर्मनीचा पराभव करत ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. भारताला 1980 नंतर पहिल्यांदाच हॉकीमध्ये ऑलिम्पिक मेडल मिळाले आहे.
पाकिस्तानला किती मेडल?
भारताने यावेळी रिओ ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक इतिहासातील मोठे पथक देखील टोकयोला पाठवले. काही भारतीय खेळाडूंना मेडल मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी चांगली कामगिरी करत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Tokyo Olympics : जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण
त्याचवेळी भारताचा शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानला या ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत एकही मेडल मिळालेलं नाही. पाकिस्तामचे 7 पुरुष आणि 3 महिला असे फक्त 10 खेळाडूच या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले.  एकूण 6 खेळामध्ये हे खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र त्यांची पदक संख्या शून्य आहे. विशेष म्हणजे एकेकाळी हॉकीतील बलाढ्य टीम समजली जाणारी पाकिस्तानची पुरुष टीम यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र देखील होऊ शकली नाही.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #भरतल #ऑलमपकमधय #मडल #पकसतनल #कत #आहत #महत #आह #क

RELATED ARTICLES

ईडीच्या छापेमारीनंतर आता Vivo चे डायरेक्टर देशातून फरार, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीचा आरोप

ED raids on Vivo : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चिनी मोबाईल कंपनी Vivo विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास तीव्र...

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा

UK Political Crisis:  ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24...

Most Popular

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा

UK Political Crisis:  ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24...

लिस्ट तयार ठेवा! सुरू होतोय Amazon चा खास सेल, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्ली : Amazon Prime Days Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार आहे. Amazon ने या सेलच्या तारखांची...

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 07 जुलै 2022 : गुरुवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन,...

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...