Monday, July 4, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : भारताला आज तिसऱ्या मेडलची अपेक्षा! कमलप्रीत कौरला इतिहास रचण्याची...

Tokyo Olympics : भारताला आज तिसऱ्या मेडलची अपेक्षा! कमलप्रीत कौरला इतिहास रचण्याची संधी


टोकयो, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला आजवर दोन मेडल मिळाली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं  (Mirabai Chanu) सिल्व्हर तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे. आता या दोन मेडलनंतर आणखी एक मेडल भारताला सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. भारताला तिसऱ्या मेडलची अपेक्षा कमलप्रीत कौरकडून (Kamalpreet Kaur) आहे.
कमलप्रीतनं थाळी फेक स्पर्धेतील  (Discus Throw) पात्रता फेरीत जोरदार कामगिरी करत सर्व देशाची अपेक्षा वाढवली आहे. पात्रता फेरीतील 31 खेळाडूंपैकी  फक्त दोन खेळाडूंना फायनलमध्ये थेट प्रवेश मिळाला. यामध्ये कमलप्रीत आहे. कमलप्रीतनं तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर लांब थाळी फेकत फायनलमध्ये प्रवेश केला होता.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेता कोच वीरेंद्र पूनिया (Virendra Poonia) यांनी कमलप्रीत यावेळी गोल्ड मेडल जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. कमलप्रीतनं भारतामधील स्पर्धेत 66.59 मीटर लांब थ्रो केला होता. या प्रदर्शनाची पुनरावृत्ती तिनं टोकयो ऑलिम्पिकमधील फायनलमध्ये केली तर ती गोल्ड मेडल नक्की जिंकेल, असा विश्वास पूनिया यांनी केला आहे.

पात्रता फेरीत जोरदार खेळ
कमलप्रीतनं दुसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या वालारी अलमॅननं 64.42 मीटर लाबं थाळी फेकत पहिला क्रमांक पटकावला. कमलप्रीत आणि वालरी या दोघींचाही ग्रुप बी मध्ये समावेश होता. ग्रुप ए मधील एकाही खेळाडूला 64 मीटरचा पल्ला गाठता आला नाही.
Tokyo Olympics: ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे?
आता फायनलमध्ये अंतिम 12 खेळाडूंची लढत सोमवारी होणार आहे. एथलेटिक्समध्ये भारताला आजवर एकही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. कमलप्रीत ऐतिहासिक कामगिरी करणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. भारताला भालाफेकीत नीरज चोप्राकडूनही अपेक्षा आहे. त्याच्या खेळातील स्पर्धा 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #भरतल #आज #तसऱय #मडलच #अपकष #कमलपरत #करल #इतहस #रचणयच #सध

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असेल खास; असा जाईल दिवस

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...