Saturday, August 13, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : भारताची 'चक दे' कामगिरी, कबीर खानच्या ट्वीटवर खऱ्या कोचची...

Tokyo Olympics : भारताची ‘चक दे’ कामगिरी, कबीर खानच्या ट्वीटवर खऱ्या कोचची भन्नाट रिएक्शन


टोकयो, 2 जुलै : भारतीय  महिला हॉकी टीमनं (Indian Women’s Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या टीमनं क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 नं पराभव केला. भारतीय महिलांच्या या विजयानंतर अनेकांना शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुख्य भूमिका असलेल्या चक दे! इंडिया (Chak De! India)  या सिनेमाची आठवण झाली. या सिनेमातही भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
भारताच्या विजयानंतर अनेकांनी टीमचे कोच शोर्ड मरीने (Sjoerd Marijne) आणि चक दे इंडियामधील महिला टीमचा कोच कबीर खान (Kabir Khan) अर्थात शाहरुख खान यांच्यात ट्विटरवर संवाद रंगला.  हॉकी टीमच्या खऱ्या कोचनं पडद्यावरच्या कोचला भन्नाट उत्तर देत नेटीझन्सची मनं जिंकली आहेत.
शोर्ड मारीने यांनी भारताच्या विजयानंतर महिला टीमच्या फोटोसह एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी आपण घरी उशीरा येणार असल्याचं कुटुंबीयांना कळवले होते. ते ट्विट रीट्विट करत शाहरुख खाननं प्रतिक्रिया दिली आहे. “होय, काहीही हरकत नाही. फक्त परत येताना तुमच्या अब्जावधी कुटुंबीयांसाठी सोने घेऊन या. यावेळी धनत्रयोदशी देखील 2 नोव्हेंबर (शाहरुख खानचा वाढदिवस) आहे – माजी प्रशिक्षक कबीर खान’ असं ट्विट शाहरुखनं केलं.

त्यानंतर शोर्ड मरीने यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. “तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. आम्ही पुन्हा एकदा आमचे सर्वस्व पणाला लावू – खरा प्रशिक्षक’ असं उत्तर त्यांनी दिलं असून हे उत्तर आता व्हायरल झालं आहे.

कोण आहेत मरीने?
शोर्ड मरीने हे हॉलंडचे असून त्यांना 10 वर्ष हॉकी खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी 2018 साली महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली. भारतीय महिला टीम 36 वर्षांनी ऑलिम्पिकसाठी पात्र झाली होती. त्यामुळे टोकयो ऑलिम्पिकमध्ये टीम चांगली कामगिरी करेल ही मुख्य जबाबदारी मरीने यांच्या खांद्यावर होती.
‘ये चांद सा रोशन चेहरा’, विराट-अनुष्काच्या डान्सचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का?
भारतीय महिला टीममध्ये गुणवत्तेला कमी नाही. या गुणवत्तेला योग्य तंत्राची जोड मरीने यांनी दिली. त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन टीमच्या फिटनेसपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागत नाही. त्याचा फटका मॅचमध्ये बसतो. हे लक्षात घेऊन त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. त्याचा परिणाम या ऑलिम्पिकमध्ये दिसतो आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #भरतच #चक #द #कमगर #कबर #खनचय #टवटवर #खऱय #कचच #भननट #रएकशन

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...