Saturday, August 13, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics: बेल्जियमकडून भारतीय टीमचा पराभव, 41 वर्षांनंतर भारतीय टीमचं हॉकी गोल्ड मेडलचं...

Tokyo Olympics: बेल्जियमकडून भारतीय टीमचा पराभव, 41 वर्षांनंतर भारतीय टीमचं हॉकी गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं 


टोकियो, 3 ऑगस्ट : टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) मध्ये पुरुष हॉकीच्या सेमीफायनल (Hockey Men’s Semi Final) मध्ये भारत आणि बेल्जियम (India vs Belgium) यांच्यात झालेली मॅच सुरुवातीला खूपच अटीतटीची झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय हॉकी टीमला विश्वविजेत्या बेल्जियमने 5-2 ने पराभूत केलं आहे.

मॅच सुरू होताच बेल्जियमने भारतीय हॉकी टीम विरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय टीमने सुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत बरोबरी केली. यानंतर भारतीय टीमने आणखी एक गोल करत 2-1 ने आघाडी घेतली. मग, बेल्जियमच्या टीमने सुद्धा गोल करत 2-2 ने बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा बेल्जियमच्या टीमने एका मागे एक असे दोन गोल करत 5-2 ने आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

भारतीय हॉकी टीमचा पराभव झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं, जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा एक भाग आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकी टीमने त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि तेच महत्त्वाचे आहे. टीमला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आमच्या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे.

पंतप्रधान मोदी सुद्धा पाहत होते मॅच

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारत विरुद्ध बेल्जियम ही सेमीफायनल मॅच लाईव्ह पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारतीय टीमला प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं, मला माझ्या टीमचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे.

भारत विरुद्ध बेल्जियम मॅचेसची आकडेवारी

2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने भारताचा 3-0ने पराभव केला होता. तर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने 3-1 ने पराभूत केलं होतं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #बलजयमकडन #भरतय #टमच #परभव41 #वरषनतर #भरतय #टमच #हक #गलड #मडलच #सवपन #भगल

RELATED ARTICLES

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

Most Popular

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Salman Rushdie stabbed : लेखक रश्दींवर अमेरिकेत चाकूहल्ला, कुमार केतकर म्हणतात…

<p>Salman Rushdie stabbed : लेखक रश्दींवर अमेरिकेत चाकूहल्ला, कुमार केतकर म्हणतात...</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...