Friday, August 12, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : फायनलमध्ये पराभव झाला, पण कमलप्रीतने जिंकली भारतीयांची मनं

Tokyo Olympics : फायनलमध्ये पराभव झाला, पण कमलप्रीतने जिंकली भारतीयांची मनं


टोकयो, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये (Women’s discus throw Final) पोहोचलेली कमलप्रीत कौर हिला सोमवारी मेडल जिंकण्यात अपयश आलं. फायनलमध्ये ती सहाव्या क्रमांकावर राहिली. कमलप्रीतचा (Kamalpreet Kaur) बेस्ट स्कोअर 63.70 राहिला. फायनलमध्ये पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही अंतर्गत दुखापतीमुळे तिला मेडल मिळवता आलं नाही. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठल्यामुळे कमलप्रीतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी कमलप्रीत कौरचा उल्लेख प्रेरणास्त्रोत असा केला आहे.
‘कधीतरी आपण जिंकतो, कधी हरतो. हार्डलक कमलप्रीत. आम्हाला तुझा अभिमान आहे. एवढ्या मोठ्या मंचावर तू भारताचं प्रतिनिधीत्व केलंस आणि आपली सर्वोत्तम कामगिरी केलीस. हा अनुभव तुला भविष्यात नक्कीच मजबूत खेळाडू बनवेल,’ असं सचिन तेंडुलकर म्हणाला.


‘कमलप्रीत मी तुझा फॅन झालो आहे. मेडल मिळालं नाही, तरी तुझा प्रयत्न उत्कृष्ट होता. तू डिस्कस थ्रोमध्ये हजारो लोकांची रुची वाढवलीस. तुला लवकरच मेडलही मिळेल,’ असं ट्वीट सेहवागने केलं.

फायनलमध्ये कमलप्रीत दुखापतींसह मैदानात उतरली होती. तिच्या खांद्यावर आणि पायावर पट्टी बांधण्यात आली होती, याशिवाय तिला काही अंतगर्त दुखापत झाल्याचंही कॉमेंटेटर्सनी सांगितलं. पूर्णपणे फिट नसतानाही कमलप्रीतने टॉप-8 मध्ये स्थान पटकावलं.
कमलप्रीतने आपला पहिला थ्रो 61.62 मीटर लांब फेकला, पण तिचा दुसरा, चौथा आणि सहावा थ्रो खराब झाला, ती फाऊल करून बसली. तिसऱ्या थ्रोमध्ये तिने 63.70 मीटर थ्रो करून टॉप 6 मध्ये आली.
अमेरिकेच्या वॅलरी ऑलमेननं 68.98 मीटर लांब थ्रो करून गोल्ड मेडल पटकावलं. जर्मनीच्या क्रिस्टन पुडनेज 66.86 मीटरचा थ्रो करून सिल्व्हर तर क्युबाच्या येमी परेजने 65.72 मीटरचा थ्रो करून ब्रॉन्झ मेडल मिळवलं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #फयनलमधय #परभव #झल #पण #कमलपरतन #जकल #भरतयच #मन

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

हिपॅटायटिसने प्रत्येक 30 सेकंदाला होतो 1 मृत्यू, WHO च्या टिप्स

हिपॅटाइटिस (Hepatitis Virus) हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो शरीरात जाऊन लिव्हरला सूज येण्यामागचे प्रमुख कारण ठरतो. लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

गर्भातील बाळाची पोझिशन कशी ओळखाल? त्याचा प्रसूतीवर परिणाम होतो का?

Know Baby Position : बेबी मॅपिंग म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेऊया. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बाळाची पोझिशन जाणून घेण्यासाठी बेली मॅपिंग केलं...