We are all elated by the stellar performance by @Pvsindhu1. Congratulations to her on winning the Bronze at @Tokyo2020. She is India’s pride and one of our most outstanding Olympians. #Tokyo2020 pic.twitter.com/O8Ay3JWT7q
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकला रवाना होण्याआधी खेळाडूंशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पीव्ही सिंधूला तू टोकयोवरून परत आलीस की आपण आईसक्रीम खाऊ, असं सांगितलं होतं. ऑलिम्पिकआधी सिंधूसोबत बोलताना मोदींनी सिंधूला तिच्या आईसक्रीमच्या आवडीबद्दल विचारलं होतं. एवढ्या मोठ्या स्पर्धेआधी आपल्याला आईसक्रीम खाता येत नाही, कारण ऑलिम्पिकची तयारी करताना अशा गोष्टींवर ताबा ठेवावा लागतो, असं सिंधू पंतप्रधानांना म्हणाली होती. सिंधूच्या या वक्तव्यानंतर मोदींनी आपण एकत्र आईसक्रीम खाऊ असं तिला सांगितलं.
पंतप्रधानांसोबत संवाद साधल्यानंतर सिंधूने प्रतिक्रिया दिली होती. ‘पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणं हा माझा सन्मान आहे. मी त्यांना आणि देशाच्या सगळ्यांना धन्यवाद देते, कारण नेहमीच आम्हाला पाठिंबा मिळत आला आहे. आम्हीही ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करू,’ असं सिंधू म्हणाली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Tokyo #Olympics #पतपरधन #नरदर #मद #सधसबत #खणर #आईसकरम #करण