Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य...

Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय


टोकयो, 2 ऑगस्ट : ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये तब्बल 49 वर्षांनी भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं (Indian men’s hockey team) सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या टीमपासून प्रेरणा घेत भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव केला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला हॉकी टीमनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला आहे.
फर्स्ट हाफमध्ये आघाडी
भारतीय टीमला या मॅचच्या सुरुवातीलाच धक्का बसला. पहिल्या क्वार्टरमध्ये शर्मिला जखमी झाली. या दुखापतीनंतरही भारतानं झुंजार खेळ केला. ऑस्ट्रेलियन टीमच्या चांगल्या चाली आपल्या टीमनं उधळल्या. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही टीमला एकही गोल करता आला नाही.  दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय टीमनं वर्चस्व गाजवलं. गुरुजीत कौरनं (Gurjit Kaur) 22 मिनिटाला गोल करत भारतीय टीमला आघाडी मिळवून दिली. विशेष म्हणजे गुरुजीतनं टीमला मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नवर गोल केला. गुरुजीतचा हा ऑलिम्पिकमधील पहिलाच गोल आहे. या गोलमुळे भारतानं पहिल्या हाफमध्ये 1-0 नं आघाडी घेतली.
भारतीय टीमनं तिसऱ्या क्वार्टरमध्ये भक्कम बचावावर भर दिला. सविता पुनियाच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टरमध्येही यश मिळाले नाही. वर्ल्ड रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया नंबर दोन वर आहे. ऑस्ट्रेलिया टीममध्ये अनुभवी आणि तरुण खेळाडूंचं चांगलं मिश्रण आहे. त्यांनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करण्यात यश मिळाले नाही.
Tokyo Olympics : आपली नारी जगात भारी! 125 वर्षात पहिल्यांदाच 3 भारतीय महिलांनी इतिहास घडवला
चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी कॉर्नर भारतीय टीमनं निष्फळ ठरवले. ऑस्ट्रेलियानं शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. ऑस्ट्रेलियाला मॅच संपण्यास तीन मिनिटे कमी असताना आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय बचाव फळीनं ते गोल देखील अडवले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #चक #द #इडय #भरतय #महलच #सम #फयनलमधय #परवश #बलढय #ऑसटरलयवर #वजय

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

OnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : वनप्लस या अँड्रॉइड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने OnePlus Nord 2T हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स...

तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट

प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय...

मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

नीरजचा आणखी एक धमाका, फक्त १६ दिवसात मोडला स्वत:चा विक्रम आणि जिंकले पदक

स्टॉकहोम (स्वीडन): टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा(Neeraj Chopra )ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. स्टॉकहोम डायमंड लीग(Stockholm Diamond League)मध्ये नीरजने ८९.९४ मीटर...

Sanju Samsonने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड व्हावं,क्रिकेट वर्तुळात एकचं चर्चा

मुंबई : टीम इंडियातला प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय. त्यामुळे संजू चाहते सध्या शॉकमध्ये आहेत. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस...