Monday, July 4, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमारला आज गोल्डन चान्स, रवीची आई म्हणाली...

Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमारला आज गोल्डन चान्स, रवीची आई म्हणाली…


टोकयो, 5 ऑगस्ट : संपूर्ण देशाचं गुरुवारी लक्ष हे रवी कुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) या कुस्तीपटूकडं आहे. रवी कुमार गुरुवारी  57 किलो वजनी गटातील फायनलमध्ये खेळणार आहे. ऑलिम्पिक इतिहासात कुस्तीमध्ये फायनल गाठणारा रवी कुमार हा दुसरा भारतीय मल्ल आहे. यापूर्वी सुशील कुमारनं लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले होते. यंदा रवीला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे.
रवी कुमारच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. तो गोल्ड मेडल जिंकूनच परत येईल असा विश्वास त्याच्या आईनं व्यक्त केलाय. रवी घरी परतल्यानंतर त्याच्या आवडीची खीर आणि चूरमा देऊन त्याचं स्वागत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
‘रवी गोल्ड मेडल जिंकून परत येईल त्यावेळी त्याचे भव्य स्वागत करण्यात येईल. तो सेमी फायनलमध्ये खेळत असताना एकाक्षणी हरला असं मला वाटलं होतं, त्यामुळे मी रडू लागले. पण रवीनं शेवटपर्यंत हार मानली नाही. त्यानं ती मॅच जिंकत देशासाठी मेडल पक्कं केलं, ‘ असं त्याच्या आईनं सांगितलं.
दिवाळीला घरी आला नाही!
रवी कुमारला कुस्तीचा ध्यास आहे. तो दिवाळीला देखील घरी आला नाही. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दिल्लीहून रशियाला गेला. तिथं अभ्यास करुन टोकयोमध्ये पोहचला. ऑलिम्पिक पदक घेऊनच गावी परत येणार हा शब्द रवीनं पूर्ण केला आहे, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
Tokyo Olympics 2020: भारताचे 5 हीरो, ज्यांनी घडवला 41 वर्षांनंतर इतिहास
रवीनं सेमी फायनलमध्ये कझाकस्तानच्या  कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवाचा पराभव केला. रवीनं सेमी फायनलमध्ये जिगरबाज खेळ करत पराभवाच्या तोंडातून विजय खेचून आणला आणि भारताचे आणखी एक मेडल नक्की केले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #कसतपट #रव #कमरल #आज #गलडन #चनस #रवच #आई #महणल

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....