Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics: ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे?

Tokyo Olympics: ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे?


मुंबई, 2 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women’s Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 नं पराभव करत भारतीय टीमनं पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची महिला हॉकी टीम मोठ्या स्पर्धेतील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करते, हे आपण यापूर्वी चक दे! इंडिया (Chak De! India) या सिमेमात पाहिलं आहे. या सिनेमातील कथा प्रत्यक्ष मैदानात घडली आहे. यामध्ये भारतीय महिला टीमचे कोच शोर्ड मरीने (Sjoerd Marijne) यांचा मोठा वाटा आहे. मरीने हे या स्पर्धेत रिअल लाईफमधील कबीर खान ठरले आहेत.
कसे झाले कबीर खान!
शोर्ड मरीने हे हॉलंडचे असून त्यांना 10 वर्ष हॉकी खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी 2018 साली महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली. भारतीय महिला टीम 36 वर्षांनी ऑलिम्पिकसाठी पात्र झाली होती. त्यामुळे टोकयो ऑलिम्पिकमध्ये टीम चांगली कामगिरी करेल ही मुख्य जबाबदारी मरीने यांच्या खांद्यावर होती.
भारतीय महिला टीममध्ये गुणवत्तेला कमी नाही. या गुणवत्तेला योग्य तंत्राची जोड मरीने यांनी दिली. त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन टीमच्या फिटनेसपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागत नाही. त्याचा फटका मॅचमध्ये बसतो. हे लक्षात घेऊन त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. त्याचा परिणाम या ऑलिम्पिकमध्ये दिसतो आहे.
अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असूनही टीममधील जागा जाईल या भीतीनं सराव करत. मरीने यांनी या खेळाडूंना विश्वास दिला. त्यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंना पुरेसा आराम मिळेल तसेच त्यांच्यावर योग्य उपचार होतील यावर भर दिला. त्याचबरोबर त्यांनी खेळाडूंंमधील नेतृत्वगूण त्यांनी विकसीत केले.

‘ऑलिम्पक्स डॉट कॉम’ या वेबसाईटशी बोलताना भारतीय हॉकी टीममधील खेळाडू गुरजीत कौरनं (Gurjit Kaur) सांगितलं की, ‘मरीन यांनी आमच्यातील नेतृत्त्वगूण विकसीत केले. मैदानात कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर खेळाडूंनीच मार्ग शोधला पाहिजे, असा कानमंत्र मरीन यांनी दिला. त्याचबरोबर आमच्या खेळातील कोणतीही अडचण दूर करण्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात.’ मरीन यांच्या या शिकवणीचा फायदा गुरजीतला झाला. गुरजीतनं केलेल्या एकमेव गोलच्या जोरावरच भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय
पुढील सामना अर्जेंटीनाशी
भारतीय महिला  टीमची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली. मात्र भारताने शेवटच्या दोन सामन्यात आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये भारतीय टीमनं तीन वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत अर्जेंटीनाशी होणार असून हा सामना बुधवारी होणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #ऑसटरलयल #परभत #करणर #रअल #लईफमधल #कबर #खन #कण #आह

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची “हीच ती वेळ”

मुंबई : आज पासून 3 दिवस Flipkart Big Bachat Dhamaal Sale July 2022 सुरू होतोय. या बिग बचत धमाल सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि...

ठाकरे सरकारनेही फडणवीस सरकारचे निर्णय केले होते रद्द

<p style="text-align: justify;">मुंबई : राज्यात नवीन सरकार आले की, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच मागील सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले जातात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा...

करण जोहरला मोठा धक्का,’या’ दोन स्टार्सनी नाकारली Koffee With Karanची ऑफर!

करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

रिषभ पंतने रचला इतिहास, १२० वर्षांत एकाही क्रिकेटपटूला जमली नाही ही मोठी गोष्ट

भारताची ५ बाद ९८ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी पंत हा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. कारण पंतने यावेळी फक्त भारताच्या डावाला आधार...

आकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक

पृथ्वीवरुन निळ्या रंगाचे आकाश दिसते, मग मंगळावरुन कोणत्या रंगाचे आकाश दिसत असेल, तुम्हाला माहितीय? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...