टोकयो, 2 ऑगस्ट : जगातल्या कोणत्याही खेळाडूचं स्वप्न ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल (Olympic Gold Medal) जिंकणं असतं. खेळातल्या यशाचं हे सगळ्यात उंच शिखर मानलं जातं, पण कतारचा एथलीट मुताज एस्सा बारिशम (Mutaz Essa Barshim) याच्यादेखील पुढे गेला आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडलसह त्याने माणुसकीचं मेडल आणि जगभरातल्या क्रीडा रसिकांचं मनही जिंकलं आहे.
टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) पुरुषांच्या हाय जम्पमध्ये (High Jump) ही घटना घडली. बारशिम आणि इटलीचा गियानमार्को तांबेरी (Gianmarco Tamberi) दोघांनी 2.37 मीटर उडी मारली, यामुळे दोघंही पहिल्या क्रमांकावर आले. यानंतर अधिकाऱ्यांनी दोघांना प्रत्येकी 3-3 उड्या मारायला सांगितल्या. दोघांपैकी एकालाही तीन उड्यांमध्ये 2.37 मीटरच्या वर जाता आलं नाही.

जेव्हा तीन जास्तच्या उड्यांनंतरही विजेत्याचा निर्णय होऊ शकला नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी दोघांना एक-एक उडी मारायला सांगितली. यावेळी तांबेरीला दुखापत झाली. पायाच्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. यानंतर बारशिमकडे उडी मारून गोल्ड मेडल जिंकण्याची संधी होती, पण आपण नाव मागे घेतलं तर काय निर्णय लागेल, असा प्रश्न बारशिमने अधिकाऱ्यांना विचारला. नाव मागे घेतलं तर दोघांनाही गोल्ड मेडल देण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं. यानतंर बारशिमने नाव मागे घेतलं आणि दोघांनाही गोल्ड मेडल देण्यात आलं.
बारशिमने या ऐतिहासिक निर्णयानंतर आपली भूमिका मांडली. खेळामध्ये जिंकणंच सगळं नसतं, आम्ही पुढच्या पिढीला संदेश दिला आहे की कसं खेळलं पाहिजे. प्रतिस्पर्ध्याचाही सन्मान कसा केला पाहिजे. यशामध्येही तो वाटेकरी होता, असं बारशिम म्हणाला. सामन्यानंतर तांबेरीने आनंदाने बारशिमशी गळाभेट घेतली. दोघांनीही मैदानात फेरी मारून आपली भावना प्रकट केली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Tokyo #Olympic #मनवतच #मडल #वरध #खळडसह #तयन #घतल #गलड #करण #वचन #सलम #करल