Saturday, August 13, 2022
Home विश्व Tokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा

Tokyo Olympic : जपानमध्ये कोरोनाचा कहर, जपान सरकारने केली आणीबाणीची घोषणा


Tokyo Olympic 2020 जपान सरकारने कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Japan) वाढत्या रुग्णांमुळे 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी (Emergency) लागू केली आहे.

Tokyo Olympic 2020 जपान सरकारने कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Japan) वाढत्या रुग्णांमुळे 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी (Emergency) लागू केली आहे.

टोकयो, 31 जुलै : जपान सरकारने कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Japan) वाढत्या रुग्णांमुळे 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी (Emergency) लागू केली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणीबाणी टोकयो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका आणि ओकिनावामध्ये लागू करण्यात आली आहे. या राज्यांशिवाय होक्काइडो, इशिकावा, क्योटो, ह्योगो आणि फुकुओका या प्रांतांमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या टोकयोमध्ये ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धा सुरू आहे.
जगभरातले हजारो खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी टोकयोमध्ये आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत आणीबाणी लागू करण्याबाबतची घोषणा केली आहे.
टोकयो आणि ओकिनावामध्ये पहिल्यापासूनच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ही आणीबाणी 22 ऑगस्टला संपणार आहे. जपानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार देशात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला आहे. टोकयो शहरातल्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार 29 जुलैला 3,865 नवे रुग्ण आढळले, तर संपूर्ण देशात 10,699 कोरोना रुग्ण सापडले होते. महामारी सुरू झाल्यानंतर हे दोन्ही आकडे सर्वाधिक आहेत. सरकार कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करत आहे, पण संक्रमण कमी व्हायची गती कमी होत नाही.
टोकयो आणि ओकिनावामध्ये लावण्यात आलेले निर्बंध ऑलिम्पिक आणि ओबोन हॉलीडे लक्षात घेऊन लावण्यात आले आहेत. टोकयोमध्ये ऑलिम्पिकनंतर पॅरालिंपिकचं (Paralympic) आयोजन करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Tokyo #Olympic #जपनमधय #करनच #कहर #जपन #सरकरन #कल #आणबणच #घषण

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

पाऊस फुल अन् धरणं हाऊसफुल्ल

<p><strong>Pune Rain Update:</strong> पुणे (Pune) जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी (Dam) 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे....

Agniveer recruitment 2022: पुणे लष्कर मुख्यालयात अग्निपथ भरती प्रक्रियेला सुरुवात

Agniveer recruitment 2022: अग्निपथ योजनेंतर्गत (Agniveer ) राज्यातील पहिली भरती प्रक्रिया पुणे (Pune) येथील भरती मुख्यालयाने आयोजित केली...

अशी कोणती कागदपत्रं ट्रम्पकडे आहेत, ज्यामुळे FBI घरापर्यंत पोहचली; अमेरिका हादरली

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी FBIने टाकलेले छापे कशासाठी होते या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अस्वीकरण: ही...

सेफ रिलेशनबाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्राच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ...