Monday, July 4, 2022
Home भारत Todays Headline 24 th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

Todays Headline 24 th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या


मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी… या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र 

एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय.  भरत गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, असं पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलंय. 12 आमदारांना कारवाई करण्याचं पत्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा पत्र लिहित भरत गोगावलेच आमचे प्रतोद आहेत असं म्हटलंय. त्यामुळे एकनाथ  शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय.

अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी

दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार आहे. परबांना आज ११ वाजता पुन्हा चौकशीला बोलावलंय. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे.

द्रौपदी मुर्मू  आज उमेदवारी अर्ज भरणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी  एनडीएने   द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू आज दुपारी 12.30 वाजता  आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजप संसदीय मंडळाने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी 20 नावांवर चर्चा केली. त्यानंतर पूर्व भारतातील आदिवासी महिलेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्रौपदी मुर्मू भाजपच्या उमेदवार आहेत. 

अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषीत केलेल्या अग्निपथ योजनेविरुद्ध संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार आहे.

 जुग जुग जियो आज प्रदर्शित होणार

दिग्दर्शक करण जोहरचा  जुग जुग जियो  हा चित्रपट आज  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि नितू कपूर  हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

आज शमशेराचा ट्रेलर लॉन्च होणार

 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  सध्या ‘शमशेरा’  सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त  आणि वाणी कपूरदेखील (Vaani  दिसणार आहे. आज शमशेराचा आज ट्रेलर लॉन्च होणार आहे. 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Todays #Headline #June #आज #दवसभरत #घडणऱय #महततवचय #बतमय

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

100 Days of Yogi Government: ५०० एन्काउंटर, १९२ कोटींची संपत्ती जप्त…; योगी सरकारचे १०० दिवसांतील धडाकेबाज निर्णय

100 Days of Yogi Government: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार मार्च २०१७मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलं. २०१७ ते २०२२पर्यंतच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारकडून...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...