Friday, May 20, 2022
Home करमणूक The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने केला जागतिक विक्रम

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ने केला जागतिक विक्रम


Kashmir Files Sign Language : मार्चमध्ये प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा आता 13 मे रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे हा सिनेमाचा भारतीय सांकेतिक भाषेत ओटीटीवर प्रीमिअरदेखील होत आहे. 

झी 5 ने नुकतेच मुंबईत ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचे भारतीय सांकेतिक भाषेत खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. कमी ऐकू येणाऱ्या 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत हे स्क्रीनिंग पार पडले. या विशेष स्क्रीनिंगला विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता दर्शन कुमार यांनी हजेरी लावली होती. 

भारतीय सांकेतिक भाषेत बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित करणारे झी 5 हे पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. यामुळे कर्णबधिरांना सिनेमा पाहणे आणि समजणे सोपे झाले आहे. सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचावा हा त्यामागचा उद्देश आहे. 

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आता हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेतसह  भारतीय सांकेतिक भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे”. 

‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या सिनेमात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.

सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी

सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालण्यात येणार आहे. याचे कारण चित्रपटात दाखवण्यात आलेली तोडफोड असल्याचे म्हटले जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ शहर-राज्य मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेबाहेर आहे. अहवालात अधिकाऱ्यांनी सांगितले की, चित्रपटात मुस्लिमांचे चिथावणीखोर आणि एकतर्फी चित्रण आहे. यासोबतच काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षात हिंदूंचा होणारा छळही एकतर्फी आहे, या गोष्टी नियमांविरुद्ध आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ सिंगापूरच्या चित्रपट वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

The Kashmir Files : सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी! जाणून घ्या कारण…

देशात वेगळं वातावरण करण्याचं काम काही शक्ती करत आहेत; ‘द काश्मीर फाईल्स’चा संदर्भ देत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

The Kashmir Files OTT Debut: ‘द कश्मीर फाइल्स’ आता घरबसल्या पाहता येणार! जाणून घ्या कधी आणि कुठे…अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Kashmir #Files #द #कशमर #फइलसन #कल #जगतक #वकरम

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...