भारतामधील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल (Barry O’Farrell) यांनी भारतीय टीमचं अभिनंदन करताना गोल किपर सविता पूनियाचं (Savita Punia) विशेष अभिनंदन केलं आहे. बॅरी यांनी सविताचं वर्णनं ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ (The Great Wall of India) असं केलं आहे. सवितानं क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 9 पेनल्टी कॉर्नर सेव्ह केले.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा (SRH) माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) यानंही भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे. भारतीय टीमच्या विजयाबद्दल सनरायझर्स हैदराबादनं केलेलं ट्विट वॉर्नरनं रिट्विट केलं आहे. ” शाब्बास मुलींनो! तुम्ही तुमचा सर्वश्रेष्ठ खेळ दाखवला. भारताचेही अभिनंदन. गुड लक!’ अशी प्रतिक्रिया वॉर्नरनं दिली आहे.
Well done to our girls they did their best and congratulations to India, good luck 👍 https://t.co/BddvYlofME
— David Warner (@davidwarner31) August 2, 2021
Tokyo Olympics : भारताला आज तिसऱ्या मेडलची अपेक्षा! कमलप्रीत कौरला इतिहास रचण्याची संधी
भारतीय महिला टीमची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली. मात्र भारताने शेवटच्या दोन सामन्यात आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये भारतीय टीमनं तीन वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत अर्जेंटीनाशी होणार असून हा सामना बुधवारी होणार आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Great #Wall #India #भरतय #गल #कपरच #ऑसटरलयकडन #कतक #वरनर #महणल