Saturday, May 21, 2022
Home करमणूक The Archies: एकाच सिनेमातून 3 स्टारकिड्सचा डेब्यू; बड्या कलाकारांची मुलं झळकणार

The Archies: एकाच सिनेमातून 3 स्टारकिड्सचा डेब्यू; बड्या कलाकारांची मुलं झळकणार


मुंबई, 14 मे- सध्या अनेक बॉलिवूड कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये   (Starkids)  एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. अनन्या पांडे, शनाया कपूरनंतर आता बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी (Shahrukh Khan Daughter)  सुहाना खान (Suhana Khan), अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा   (Agtsya Nanda)  आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण ख़ुशी कपूरसुद्धा   (Khushi Kapoor)  आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहेत. या तिघांनी नुकतंच आपल्या ‘द आर्चिज’ या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. सध्या त्यांच्या या चित्रपटाचं पोस्टर प्रचंड चर्चेत आलं आहे.

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्सनी पदार्पण केलं आहे. अनेक स्टारकिड्स यशस्वी झाले आहेत. तर काहींना हवं तसं यश मिळू शकलं नाही. तथापि जास्तीत जास्त स्टार किड्सच्या मुलांना दिग्दर्शक करण जोहरनं लॉन्च केलं आहे. त्यामुळे सर्वांनाचं अपेक्षा होती, की शाहरुखची लेक सुहानालासुद्धा करण जोहरचं लॉन्च करणार. मात्र या चर्चा मोडीत निघाल्या कारण जोया अख्तर सुहाना खानला लॉन्च करणार असल्याचं आता स्पष्ट झालंआहे. जोयाने आपल्या आगामी चित्रपटासाठी सुहाना, अगत्स्य आणि ख़ुशीची निवड केली आहे.

सुहाना खानने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने आपल्या पहिल्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. सुहाना आणि शाहरुखचे चाहते हा पोस्टर पाहून प्रचंड आनंदी आहेत. तसेच या पोस्टवर युजर्स भरभरून लाईक्स, कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. या पोस्टरमध्ये असणाऱ्या स्टार किड्सचा लुक पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आले आहेत. सोबतच युट्युबर या चित्रपटाचा पहिला टीजरसुद्धा समोर आला आहे. 1 मिनिट 35 सेकंदाचा हा टीजर आहे. अवघ्या 46 मिनिटांपूर्वी रिलीज झालेल्या या टीजरला 1.3 k लाईक्स मिळाले आहेत.तर सुहानाच्या या पोस्टवर अर्ध्या तासात 1 लाखाच्यावर लाईक्स मिळाले आहेत.

जोया अख्तरचा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक असणाऱ्या ‘आर्ची फॉर ए स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म’वर आधारित आहे. हा चित्रपट एका टीनएज जनरेशनवर आधारित असणार आहे.त्यामुळे या चित्रपटात सर्व फ्रेश चेहरे दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या टीजर आणि पोस्टरची प्रचंड चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Archies #एकच #सनमतन #सटरकडसच #डबय #बडय #कलकरच #मल #झळकणर

RELATED ARTICLES

वर्षभरापूर्वी लग्न;4 दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती,नंतर पत्नीचं धक्कादायक पाऊल

मध्य प्रदेश, 21 मे: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल...

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

Most Popular

वडिलांच्या 60व्या वाढदिवशी अभिज्ञाने उडवली धम्माल, Instagram Reel व्हायरल

मुंबई, 20 मे: सोशल मीडिया विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. कॉलेजच्या तरूण-तरूणींपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळेजण ते वापरतात. आपल्या आयुष्यात...

बॉलिवूडला पुन्हा एकदा पायरसीचा फटका! रिलीजच्या अवघ्या काही तासांतच ‘धाकड’, ‘भूलभुलैया 2’ लीक!

Dhaakad, Bhool Bhulaiyaa 2 Online Leaked : बॉलिवूडचे दोन बिग बजेट चित्रपट शुक्रवारी (20 मे) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित...

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या...

मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम सुरू

नवी दिल्ली, 21 मे : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच एका नव्या सिस्टमवर काम सुरू करणार आहे. या सिस्टममध्ये कॉलरचे अर्थात कॉल करणाऱ्या...

त्वचेकरता अक्रोड नाही तर अक्रोडच्या सालीचा ‘हा’ गुणधर्म अधिक फायदेशीर, फेसपॅक ठरू शकतो उत्तम पर्याय

अक्रोड अतिशय फायदेशीर आणि स्वादिष्ट सुकामेव्यातील पदार्थ आहे. जे तुमच्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठी आणि दिवसभर एनर्जी राहण्यासाठी मदत करतात. याचा वापर करून तुम्ही...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...