Monday, July 4, 2022
Home क्रीडा The absence of DRS system in the Ranji Trophy 2022 Final is...

The absence of DRS system in the Ranji Trophy 2022 Final is surprising vkk 95MUM vs MP Ranji Trophy final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णय पुनरावलोकन प्रणाली अर्थात डीआरएस नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डीआरएस प्रणालीचा वापर होतो. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमधील सर्व सामन्यांमध्येही ही प्रणाली वापरली जाते. असे असताना देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजीमध्ये ही प्रणाली का वापरली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा – Afghanistan Earthquake : भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राशिद खान सरसावला, सोशल मीडियावर केले भावनिक आवाहन

सध्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या रणजी करंडकातील अंतिम सामन्यात मुंबईचा फलंदाज सर्फराज खानला जीवनदान मिळाले. मध्य प्रदेशचा गोलंदाज गौरव यादवने खान पायचित असल्याचे अपील केले होते. मात्र, मैदानावरील पंचांनी खान नाबाद असल्याचा निर्णय दिला. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्यामते तर आजच्या सामन्यात डीआरएस प्रणाली असती तर कदाचित सर्फराज खानला जीवनदान मिळाले नसते. या गोष्टीचा सामन्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा – Ranji Trophy Final 2022 : ‘रणजी रनमशीन’ सर्फराज खानचे शानदार शतक, अनोख्या पद्धतीने साजरा केला आनंद

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आमचा आमच्या पंचांवर विश्वास आहे,’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. “डीआरएस वापरण्याची प्रक्रिया खर्चिक आहे. रणजीच्या अंतिम सामन्यात के. एन. अनंतपद्मनाभन आणि वीरेंद्र शर्मा हे भारतातील दोन सर्वोत्तम पंच मैदानात आहेत,” असेही हा अधिकारी म्हणाला.

रणजीमध्ये डीआरएस न वापरण्यासाठी खर्चाचे कारण दिले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयकडे पैशांची करमतरता आहे, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याच बीसीसीआयला नुकतेच आयपीएलच्या माध्यम हक्कांमधून ४८ हजार ३९० कोटी रुपये मिळाले आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#absence #DRS #system #Ranji #Trophy #Final #surprising #vkk

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

लवकर वजन कमी करण्यासाठी रोज या पदार्थाचे सेवन करा, लगेच फरक दिसेल

मुंबई :  सध्या बरेच लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, ज्यामुळे ते वजन न वाढण्यासाठी किंवा असलेले वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करतात. परंतु...

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळभाज्या खा; समस्यांपासून होईल सुटका

Health Tips : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळभाज्या खा; समस्यांपासून होईल सुटका अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Fungal Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनच्या समस्येपासून अशी सुटका मिळवा

Fungal Infection : पावसाळ्यात (Monsoon) त्वचेसंबंधित (Skin Care) अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा (Fungal Infection) धोका जास्त...

लालूप्रसाद यादव जखमी, शिडीवरून पडून गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जखमी झाल्याची बातमी...

भारताने रचला विजयाचा पाया… इंग्लंडचा पहिला डाव गुंडाळत मिळवली मोठी आघाडी

भारताने सामन्याचा दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ त्यांच्यावर फॉलोऑन लादणार का, अशी आशा चाहत्यांना निर्माण...

वयाच्या 37 व्या वर्षी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, हनीमूनचे खासगी फोटो व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हनीमूनचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...